Header Ads

स्वप्नं उराशी घेऊन कामाला गेला; परतलाच नाही! लाईट फिटिंग करताना विजेचा धक्का; तारळे खुर्दच्या २० वर्षीय पवन पाटीलचा दुर्दैवी अंत

 स्वप्नं उराशी घेऊन कामाला गेला; परतलाच नाही!

लाईट फिटिंग करताना विजेचा धक्का; तारळे खुर्दच्या २० वर्षीय पवन पाटीलचा दुर्दैवी अंत.

राधानगरी | प्रतिनिधी

राधानगरी तालुक्यातील तारळे खुर्द येथील अवघ्या २० वर्षीय पवन पंडित पाटील याचा आमजाई व्हरवडे येथे दुकानाचे लाईट फिटिंगचे काम करताना विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. तरुण वयातील या आकस्मिक मृत्यूने तारळे खुर्द गावावर शोककळा पसरली आहे.

आमजाई व्हरवडे येथे एका दुकानात लाईट फिटिंगचे काम सुरू असताना पवनला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. धक्का बसताच तो खाली कोसळला. उपस्थितांनी तातडीने त्याला उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.

अवघ्या २०व्या वर्षी पवनचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आयुष्याची नवी स्वप्ने पाहण्याच्या वयातच काळाने पवनला हिरावून नेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पवनच्या पश्चात आई-वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे. कुटुंबाचा आधार असलेल्या तरुण मुलाच्या अचानक निधनाने आई-वडिलांवर मोठे दुःख कोसळले आहे. पवनच्या निधनाची बातमी समजताच तारळे खुर्दसह परिसरातील नागरिकांनी शोक व्यक्त केला.

No comments:

Powered by Blogger.