बाळु मामा मेंढ्यांच्या बंग्याचे कुंभोज परिसरात जल्लोषात स्वागत.
बाळु मामा मेंढ्यांच्या बंग्याचे कुंभोज परिसरात जल्लोषात स्वागत.
-----------------------------
कुंभोज प्रतिनिधी
विनोद शिंगे
-----------------------------
कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज ता हातकणंगले येथे आज मोठ्या उत्साहात बाळु मामा मेंढ्यांच्या बंग्याचे स्वागत करण्यात आले.समस्त धनगर समाज,गावकरी, भाविक आणि मेंढपाळांनी एकत्र येऊन या पारंपरिक उत्सवाला धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाने साजरे केले.
बाळु मामांची मेंढपाळ संस्कृती ही केवळ एक परंपरा नसून श्रद्धेचे प्रतीक मानली जाते. मेंढ्यांच्या "बंग्या" म्हणजे बाळु मामांच्या मेंढा कळपातले खास मेंढे – जे शुभ मानले जातात. हे बंग्ये आज गावात परतले, तेव्हा डॉल्बीचा दणदणाट, त्यांचे स्वागत फुलांच्या माळा, ढोल-ताशांच्या गजरात आणि 'जय बाळु मामा' च्या घोषणांनी करण्यात आले.
स्थानिक धनगर समाजातील माजी सरपंच कोंडीबा भानुसे म्हणाले, "बंग्यांचं येणं म्हणजे आमच्यासाठी आनंदाचं आणि भरभराटीचं लक्षण आहे. या परंपरेमुळे गावात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते."
कार्यक्रमात कीर्तन, भजन आणि महाप्रसाद यांचे आयोजन करण्यात आले होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी सहभागी होऊन या परंपरेचा आनंद लुटला. परिणामी बाळूमामांच्या बघायचे कुंभोजक स्वागत होतात हजारो ग्रामस्थांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात राग लागली होती दोन दिवसासाठी बाळूमामाचे बगे कुंभोज परिसरात थांबणार असून धनगर समाजाच्या वतीने सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले आहे.विनोद शिंगे कुंभोज
Comments
Post a Comment