दिनकर कुंभार यांच्या स्मरणार्थ कौलव गिरी मठाला भरीव आर्थिक मदत.

 दिनकर कुंभार यांच्या स्मरणार्थ कौलव गिरी मठाला भरीव आर्थिक मदत.


--------------------------------------

राधानगरी प्रतिनिधी

 विजय बकर

--------------------------------------

 राधानगरी तालुक्यातील कौलव येथील गिरी मठाच्या जीर्णोद्धाराचे काम वेगाने सुरू असून, या पवित्र कार्याला कौलव पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत मिळत आहे. याच परंपरेला अनुसरून, येथील सुपुत्र दत्तात्रेय कुंभार यांनी आपल्या दिवंगत वडील, प्रतिष्ठित नागरिक आणि प्रसिद्ध कुंभार कारागीर दिनकर पांडुरंग कुंभार यांच्या स्मरणार्थ मठाला भरीव आर्थिक मदत देऊ केली आहे. उत्तर कार्याला होणाऱ्या अनावश्यक जेवणावळी आणि इतर धार्मिक खर्चांना बगल देत, त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे मठाच्या जीर्णोद्धार कार्याला नवी गती मिळाली आहे.

कौलव येथील या गिरी मठाला शंभर वर्षांची गौरवशाली समाजप्रबोधनाची परंपरा आहे. राधानगरी तालुक्यातील हा पहिला गिरी समाजाचा मठ म्हणून त्याची ओळख आहे. या मठाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे वर्षभर अखंड चालणारे ग्रंथवाचन आणि प्रवचन. याशिवाय, वर्षभर हिंदू समाजाच्या विविध सणांच्या विधी अत्यंत श्रद्धेने पार पडतात.

दिवंगत दिनकर पांडुरंग कुंभार हे कौलव पंचक्रोशीतील एक प्रसिद्ध आणि निष्ठावान कारागीर होते. त्यांची या मठावर प्रचंड श्रद्धा होती आणि गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ ते या मठाच्या सान्निध्यात होते. मठाच्या प्रत्येक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असे. त्यांचे आकस्मिक निधन कौलव पंचक्रोशीसाठी धक्कादायक होते. वडील दिनकर कुंभार यांच्या कार्याची आणि मठावरील श्रद्धेची आठवण म्हणून, त्यांचे सुपुत्र, कौलव पंचक्रोशीतील प्रसिद्ध संपादक दत्तात्रेय कुंभार यांनी मठाला मदत करण्याचा उदात्त निर्णय घेतला.

या मदतीचे स्वरूप म्हणून, दिनकर कुंभार यांच्या पत्नी श्रीमती सखुबाई दिनकर कुंभार आणि त्यांचे पुत्र दत्तात्रेय दिनकर कुंभार व सागर दिनकर कुंभार यांनी संयुक्तपणे आनंदा बुवा यांच्याकडे धनादेश सुपूर्द केला. कुंभार कुटुंबीयांनी केलेल्या या अतुलनीय मदतीमुळे कौलव परिसरात त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या कृतीतून वयोवृद्ध लोकांना तसेच धार्मिक आणि सांप्रदायिक वारसा जपणाऱ्या अनेक तरुणाईला प्रेरणा मिळाली आहे. ही मदत केवळ आर्थिक नसून, ती सामाजिक बांधिलकी आणि श्रद्धा वृद्धिंगत करणारी आहे, असे मत अनेकांनी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगरमध्ये दुकानदाराची ७.५१ लाखांची फसवणूक; दुकानातील कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल.

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.