गणेशोत्सव, ईदच्या पार्श्वभूमीवर गारगोटीत पोलिसांचे संचलन.
गणेशोत्सव, ईदच्या पार्श्वभूमीवर गारगोटीत पोलिसांचे संचलन.
---------------------------------
स्वरूपा खतकर
---------------------------------
कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील गारगोटी शहरात गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलादच्या पाश्र्वभूमीवर भुदरगड पोलिस ठाण्यातर्फे शहरातून संचलन करण्यात आले. गणेश आगमनाच्या अनुषंगाने पोलिस दलाच्या वतीने शहराच्या बाजार पेठेतून मुख्य मार्गावरून संचलन केले. पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांच्या नेतृत्वाखाली संचलन झाले. यानंतर इंजुबाई मंदिर चौकात दंगल काबू पथकाची प्रात्यक्षिके झाली.
गणेशोत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार शहरात अथवा तालुक्यात घडू नये, यासाठी खबरदारी घेतली जात आहे. गणेशोत्सव मंडळांशी नित्य संवादासाठी संबंधित पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. गणेश आगमनाचाही सर्वत्र उत्साह असून, पोलिसांकडून कार्यकर्त्यांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक लोंढे यांनी केले.
संचलन पोलिस ठाणे, क्रांती चौक, बाजारपेठ, टेमलाई मंदिर, जोतिबा मंदिर परिसर, कडगाव-गारगोटी रोड, एसबीआय बँक चौक, एसटी स्टँड, साई मंदिर, इंजूबाई मंदिर परत पोलिस ठाणे असे संचलन केले. त्यानंतर इंजूबाई मंदिर चौक येथे दंगल काबू प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक किरण लोंढे, उपनिरीक्षक जीवन पाटील, योगेश गोरे, शेख, पोलीस होमगार्ड, संचलनामध्ये सहभागी झाले होते.
Comments
Post a Comment