Header Ads

बाजार भोगाव सह परिसरात गौराईचे मोठ्या उत्साहात आगमन.

 बाजार भोगाव सह परिसरात गौराईचे मोठ्या उत्साहात आगमन.

-----------------------------

 सुदर्शन पाटील 

बाजार भोगाव 

-----------------------------

 पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव सह परिसरातील सर्व गावांमध्ये गौराईचे आज मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात आगमन झाले 

 यावेळी बाजार भोगाव सह परिसरातील महिलांनी पारंपारिक संस्कृतीचे जतन करीत गौराईचे स्वागत केले 

 गौराई आगमनासाठी महिलांनी गावातील पानवठ्याच्या ठिकाणी एकत्र जमत गौराईचे मोठ्या भक्तिभावाने पूजन केले व तेथून गौरी गीते म्हणत झिम्मा फुगडी चा फेर धरत गौराईला घरी घेऊन आल्या घरी आलेल्या गौराईचे पूजन केले गौराईच्या आगमनाने बाजार भोगाव सह परिसरातील सर्व गावांमध्ये भक्तिमय व आनंदमय वातावरण निर्माण झाले आहे आली गवर आली सोनपावली आली यासारखी गौरीचे महत्त्व सांगणारे गौरी गीते गात महिलांनी आपला आनंद व्यक्त केला यानंतर गौराईच्या शिदोरीचा मान असलेल्या भाजी भाकरी च्या शिदोरी चे घरोघरी वाटप करण्यात आले

No comments:

Powered by Blogger.