भोगेश्वर मंदिरात तिसऱ्या श्रावण सोमवारी अभिषेक व महाप्रसाद वितरण.
भोगेश्वर मंदिरात तिसऱ्या श्रावण सोमवारी अभिषेक व महाप्रसाद वितरण.
------------------------------
बाजार भोगाव
सुदर्शन पाटील
------------------------------
बाजार भोगाव : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव गावातील ग्रामदैवत व करवीर महात्म्य या ग्रंथात उल्लेख असणाऱ्या स्वयंभू भोगेश्वर मंदिरात तिसऱ्या श्रावण सोमवारी मोठ्या भक्तिभावाने अभिषेक घालण्यात आला. सकाळी मंगल ध्वनी व वेदमंत्रांच्या गजरात मंदिरातील जुगाईदेवी, रासाईदेवी, जोतिबा, गणेश, हनुमान, चव्हाटा, मरगुबाई आदी देवतांचा जल, दूध, पंचामृत व सुगंधी पाण्याने अभिषेक करण्यात आला.
अभिषेक विधी मंदिराचे पुजारी अजय पाटील व सुधीर पाटील यांच्या हस्ते पार पडला. सकाळपासूनच भाविकांची गर्दी सुरू होती. दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी गावातील उत्साही तरुणांनी खिचडी व राजगिऱ्याच्या लाडूंचा महाप्रसाद वाटपाचा उपक्रम राबविला. सुमारे ६०० हून अधिक भक्तांनी या प्रसादाचा लाभ घेतला
या धार्मिक सोहळ्यात भक्तांनी भावपूर्ण सहभाग नोंदवला. यावेळी काही भाविकांनी शिवलीलामृत ग्रंथाच्या अकराव्या अध्यायाचे पारायण करून वातावरण अधिक आध्यात्मिक केले. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी झालेल्या या उत्सवामुळे भोगेश्वर मंदिर परिसर भक्तिमय झाला होता.
फोटोओळ - 1)बाजार भोगाव येथील प्राचीन शिवलिंग 2)भोगेश्वर मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना खिचडीचे वाटप करताना तरूण वर्ग
Comments
Post a Comment