कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्रात हरित क्रांतीचा संकल्प: ५५ हजार वृक्षलागवडीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम.

 कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्रात हरित क्रांतीचा संकल्प: ५५ हजार वृक्षलागवडीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम.

-------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी

संस्कार कुंभार 

-------------------------------

कोल्हापूर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या "हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र" या संकल्पनेला मूर्त स्वरूप देताना कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये ५५ हजार वृक्षांची लागवड करण्याचा भव्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत ही वृक्षलागवड पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, जिल्हा प्रशासनाने उद्योजकांना त्यांच्या औद्योगिक जागांमध्ये सक्रिय सहभागासाठी आवाहन केले आहे.

 औद्योगिक क्षेत्रात पर्यावरणपूरक पाऊल आहे.गोशिमा कार्यालयात नुकतीच झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB), तसेच विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी आणि उद्योजक सहभागी झाले. या बैठकीत वृक्षलागवडीच्या अंमलबजावणीसाठी धोरणात्मक चर्चा झाली.


उपक्रमाचे उद्दिष्टजिल्ह्यातील हरित आच्छादन वाढवणे. पर्यावरण संवर्धनाला चालना देणे. औद्योगिक क्षेत्रात शुद्ध हवा आणि शाश्वत विकासाला प्रोत्साहन देणे.

जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजयकुमार पाटील यांनी स्पष्ट केले की, “प्रत्येक उद्योजकाने आपल्या उद्योग परिसरात स्थानिक आणि छायादार प्रजातींची झाडे लावावीत व त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी घ्यावी.”

उद्योजकांनी त्यांच्या परिसरात वृक्षलागवड पूर्ण केल्यानंतर त्याचे फोटो आणि अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करणे बंधनकारक असेल. प्लॉटच्या आकारानुसार लागवड संख्या निश्चित करण्यात आली आहे, ज्यामुळे उपक्रमात एकसंधता आणि पारदर्शकता राखली जाईल.


अजयकुमार पाटील – जिल्हा उद्योग केंद्र ,उमेश देशमुख – एमआयडीसी प्रादेशिक अधिकारी ,आय. ए. नाईक – कार्यकारी अभियंता ,निखील घरत – MPCB प्रादेशिक अधिकारी ,प्रमोद माने – SRO,स्वरूप कदम – गोशिमा,संजय देशिंगे – मानद सचिव,दीपक चोरगे – कोल्हापूर फाउंड्री अँड इंजिनिअरिंग क्लस्टर अध्यक्ष,अनिरुद्ध तगारे – गोशिमा संचालक उपस्थित होते.

 हरित महाराष्ट्रासाठी औद्योगिक क्षेत्राचा पुढाकार हा उपक्रम केवळ वृक्षलागवडीपुरता मर्यादित नसून, तो पर्यावरणपूरक औद्योगिक संस्कृती निर्माण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. उद्योजकांच्या सहभागातून समाजाभिमुख चळवळ उभारण्याचा निर्धार कोल्हापूर जिल्ह्याने घेतला आहे.

Comments

Popular posts from this blog

अनैतिक प्रेम संबंधातून शिवथर येथील विवाहित महिलेचा गळा कापून खून.

गणेश टॉकीज जवळ बुलेट ने ठोकर दिल्याने एका महिलेचा मृत्यू.तर दोघेजण जखमी.

तुरंबे येथील तेरा वर्षाची युवती चे प्रेत विहिरी सापडले.