पोलिस कर्मचारी व वकीलावर लाच मागणीचा गुन्हा दाखल प्रक्रियेत.
पोलिस कर्मचारी व वकीलावर लाच मागणीचा गुन्हा दाखल प्रक्रियेत.
----------------------------------
इचलकरंजी प्रतिनिधी
नामदेव भोसले
----------------------------------
तक्रारदाराची फसवणूक करून लाच मागणी केल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी व एका खाजगी वकिलाविरुद्ध इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अल्ताफ हारून सय्यद (पो.हे.कॉ., ब.नं. ८७१, तत्कालीन नेमणूक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, इचलकरंजी) व पवनकुमार अशोक उपाध्ये (खाजगी वकील, रा. महालक्ष्मी व्हिलेज, साळुंखे मळा, इचलकरंजी) यांनी तक्रारदाराकडे लाच मागणी केल्याचा गंभीर आरोप आहे.
तक्रारदाराने गैरअर्जदारांविरुद्ध दिलेल्या अर्जाची चौकशी सय्यद करत होते. चौकशी दरम्यान सय्यद यांनी तक्रारदारास वकील पवन उपाध्ये यांची ओळख करून देत त्यांच्याकडे पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने नाईलाजास्तव ₹४०,००० गुगल पे द्वारे उपाध्ये यांना पाठवले, जे नंतर सय्यद यांच्याकडे पोहोचविण्यात आले. मात्र पुढे सय्यद यांनी उर्वरित ठरलेली रक्कम न दिल्यास चेक परत देणार नसल्याचे सांगून लाच मागणी केली.
तक्रारदाराने थेट अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली. पडताळणी दरम्यान वकील उपाध्ये यांनी तक्रारदाराकडे सय्यद यांच्याकरीता ₹३ लाखांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले असून या मागणीस पोलीस कर्मचारी सय्यद यांनी प्रोत्साहन दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणात आरोपी सय्यद व उपाध्ये यांच्याविरुद्ध इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास अॅन्टी करप्शन ब्युरो करीत आहे.
सदर कारवाई श्री. शिरीष सरदेशपांडे (पोलीस उपआयुक्त/पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे), श्री. अर्जुन भोसले (अपर पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली वैष्णवी सुरेश पाटील (पोलीस उपअधीक्षक), प्रकाश भंडारे (सहायक पोलीस उपनिरीक्षक), विकास माने (पो.हे.कॉ.), संदिप काशीद (पो.हे.कॉ.), सचिन पाटील (पो.ना.), उदय पाटील (पो.कॉ.), प्रशांत दावणे (चा.पो.कॉ.) अॅन्टी करप्शन ब्युरो, कोल्हापूर यांच्या पथकाने केली.
Comments
Post a Comment