भैरवनाथसहकारी दूध संस्थेच्या चेअरमनपदी बाबुराव पाटील व व्हा चेअरमन पदी अर्चना माने बिनविरोध.
भैरवनाथसहकारी दूध संस्थेच्या चेअरमनपदी बाबुराव पाटील व व्हा चेअरमन पदी अर्चना माने बिनविरोध.
---------------------------
जेऊर ता. पन्हाळा
---------------------------
येथील भैरवनाथ सहकारी दूध संस्थेच्या चेअरमनपदी बाबुराव सदाशिव पाटील तर व्हा. चेअरमनपदी अर्चना विश्वास माने यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या कार्यालयात नूतन संचालक मंडळाची बैठक पार पडली.
संस्थेच्या संचालक मंडळाची नुकतीच निवडणूक बिनविरोध पार पडली त्यामध्ये बाबुराव सदाशिव पाटील अमर रामचंद्र पाटील विलास रामचंद्र पोवार संदीप बाळासो खांडेकर महादेव तुकाराम गोसावी बाबासाहेब यशवंत पाटील मंगल शामराव पाटील आक्काताई प्रकाश खांडेकर आशा सुरेश डावरे अर्चना विश्वास माने यांची संचालक पदी निवड झाली आज नूतन संचालक मंडळाची बैठक होऊन सर्वानुमते चेअरमनपदी बाबुराव सदाशिव पाटील तर व्हा. चेअरमन पदी अर्चना विश्वास माने यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बी एस हंचनाळे यांनी काम पाहिले यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांचा लेखापरीक्षक भगवान पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला स्वागत सचिव भीमराव पाटील यांनी केले ky
Comments
Post a Comment