उचंगावमधील सदगुरु कॉम्प्लेक्समध्ये घरफोडी: गणपतीचे साडेतीन किलो चांदीचे दागिने लंपास.
उचंगावमधील सदगुरु कॉम्प्लेक्समध्ये घरफोडी: गणपतीचे साडेतीन किलो चांदीचे दागिने लंपास.
-------------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
-------------------------------------
: गांधीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील उंचगाव मध्ये असणाऱ्या सदगुरू कॉम्प्लेक्समध्ये भरवस्तीत अज्ञात चोरट्यांनी दोन बंद असलेल्या घरामध्ये घरफोडी करून अंदाजे साडेतीन किलो वजनाचे चांदीचे दागिने लंपास केले आहेत.
चोरीला गेलेल्या दागिन्यांची किंमत सुमारे दीड लाख रुपये असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना भर वस्तीत घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.चोरांनी बंद घरे हेरुन चोरी करण्याचे सत्र सुरू केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
सदगुरु कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या शांता सुभाष पठाडे यांच्या घरात ही चोरी झाली. पठाडे या मूळच्या उंचगावच्या रहिवासी असून, त्या आपल्या मुलीकडे कोल्हापूर मध्ये असणाऱ्या आयडियल कॉलनीमध्ये राहतात. त्या सदगुरु कॉम्प्लेक्स मधील त्यांच्या घरी चोरी झाल्याचे त्यांच्या भाडे करू फोन करून सांगितले..
चोरीचा प्रकार सकाळी उघडकीस आला. भाडेकरू पाणी भरण्यासाठी आले असता, त्यांना पठाडे यांच्या घराचे कडी-कोंडा तुटलेले दिसले. त्यांनी तात्काळ पठाडे यांना फोन करून याबाबतची माहिती दिली. त्यानंतर घरात पाहणी केली असता, तिजोरीतील गणपतीचे सुमारे साडेतीन किलो वजनाचे चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले. यात झुंबर, हळदीकुंकू, पान-सुपारी, मोदक, नारळाचा हार, दुर्वा, आणि त्रिशूळ यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे.
याच कॉम्प्लेक्समधील शेजारी असलेल्या प्रकाश डफळे यांच्या घरातही चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला, मात्र किरकोळ रकमेव्यतिरिक्त त्यांच्या हाती काही लागले नाही.
या घरफोडीची माहिती मिळतात
घटनास्थळी गांधीनगर पोलीस ठाण्याचे पी एस आय विनय झुंजुरके हेड कॉन्स्टेबल बजरंग व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अमित मर्दाने, राजू कांबळे चोरीच्या ठिकाणांची पाहणी केली
गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही वर्षांपासून अशा अनेक चोऱ्यांच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र, अद्याप एकाही चोरीचा तपास लागलेला नाही. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेचा पुढील तपास गांधीनगर पोलीस करत आहेत.
No comments: