जयसिंगपूर नगपरिषदेच्या प्रभाग ८ मधून माजी नगरसेवक पराग पाटील आणि सौ.उज्वला वाघवेकर उमेदवारीस सज्ज
जयसिंगपूर नगपरिषदेच्या प्रभाग ८ मधून माजी नगरसेवक पराग पाटील आणि सौ.उज्वला वाघवेकर उमेदवारीस सज्ज
-----------------------जयसिंगपूर /प्रतिनिधी.
-----------------------
गेल्या आठ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीला वेग आला असून जयसिंगपूर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ८ मधून इच्छुक उमेदवारांनी उमेदवारीची तयारी सुरू केली आहे.
या प्रभागातील ‘ब’ विभागातून सर्वसाधारण पुरुष गटात माजी नगरसेवक पराग पाटील, तर अनुसूचित जाती-जमाती महिला ‘अ’ वर्गातून सौ. उज्वला उत्तम वाघवेकर यांनी उमेदवारी जाहीर केली आहे.
माजी नगरसेवक पाटील यांनी सांगितले की, “मागील पंचवार्षिक कार्यकाळात प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहिलो. नागरिकांचा प्रतिसाद आणि पाठिंबा लक्षात घेऊन पुन्हा जनतेच्या सेवेसाठी आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहोत.”
सौ. वाघवेकर यांनीही प्रभागातील महिला आणि सर्वसामान्य घटकांच्या प्रश्नांवर काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. “रस्ते, पाणी, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी आम्ही वचनबद्ध आहोत,” असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, या घोषणेमुळे प्रभाग ८ मध्ये निवडणुकीच्या तयारीला वेग आला असून स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

No comments: