भादोले गावात RAWE विद्यार्थ्यांकडून बोर्डॅक्स मिश्रण तयार करण्याचे प्रात्यक्षिक.
भादोले गावात RAWE विद्यार्थ्यांकडून बोर्डॅक्स मिश्रण तयार करण्याचे प्रात्यक्षिक.
-----------------------------------
भादोले प्रतिनिधी
किशोर जासूद
-----------------------------------
** : ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) अंतर्गत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथील कृषीकन्यांनी कु. राजनंदिनी दबडे, कु. श्रावणी गायकवाड, कु. सृष्टी गायकवाड, कु.उत्कर्षा गावडे, कु. विद्या जाधव, कु. अपेक्षा कडाळे, कु. स्वराली कांबळे यांनी शेतकऱ्यांसमोर केले भादोले गावात शेतकऱ्यांसाठी बोर्डेक्स मिक्स्चर (Bordeaux Mixture) तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवून दिले.
बोर्डो मिश्रण हे द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला व इतर फळपिकांवरील बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी वापरले जाणारे सर्वात प्रभावी व सुरक्षित बुरशीनाशक आहे. विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसमोर याच्या तयारीची संपूर्ण प्रक्रिया सविस्तर सांगितली.
तांब्याचे सल्फेट (Copper Sulphate) व चुन्याच्या पाण्याचे (Lime water) योग्य प्रमाणात मिश्रण करून हे द्रावण तयार करण्याची पद्धत विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष दाखवली. तसेच, तयार मिश्रणाचा रंग, योग्यतेची चाचणी कशी घ्यावी आणि फवारणी करताना कोणत्या काळजी घ्याव्यात हेही स्पष्ट केले.
या प्रात्यक्षिकादरम्यान शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. अनेकांनी प्रश्न विचारून अधिक माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना योग्य वेळी व योग्य प्रमाणात बोर्डो मिश्रण फवारणी केल्यास रोग नियंत्रणासोबतच पीकांचे उत्पादन व गुणवत्ता सुधारते, याची माहिती दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांचे आभार मानले व या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष करण्याची तयारी दर्शवली.
सहयोगी अधिष्ठाता डॉ. ए. ए. पिसाळ, समन्वयक डॉ. बी. टी. कोलगणे, केंद्राध्यक्ष सुनील कराड, कार्यक्रम अधिकारी ए. इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले .

No comments: