गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतून स्मशानभूमीस लाकडांचे दान.
गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतून स्मशानभूमीस लाकडांचे दान.
----------------------------------
संस्कार कुंभार
----------------------------------
गोकुळ शिरगाव : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) कडून एक अभिनव सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. औद्योगिक वसाहतीत उन्मळून पडलेली झाडे व फांद्या एकत्र करून गोकुळ शिरगाव येथील स्मशानभूमीस दान करण्यात आल्या. या संकल्पनेमुळे औद्योगिक वसाहतीतील स्वच्छता तर झालीच, पण पर्यावरणपूरक पद्धतीने समाजोपयोगी कामास देखील हातभार लागला.
सदर लाकूड दान कार्यक्रम गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील सेंटर ऑफ एक्सलन्स येथे पार पडला. या वेळी सरपंच चंद्रकांत डावरे, उपसरपंच संदीप शहाजी पाटील, सदस्य रणजीत पाटील, सतीश एरंडोले, गोशिमाचे अध्यक्ष स्वरूप कदम, उपाध्यक्ष सुनिल शेळके, मानद सचिव संजय देशिंगे, खजिनदार अमोल यादव, कोल्हापूर फौंड्री अँन्ड इंजिनियरींग क्लस्टरचे अध्यक्ष दिपक चोरगे आदी मान्यवर उपस्थित होते.
हा अभिनव उपक्रम कार्यकारी अभियंता आय. ए. नाईक व उप अभियंता अजय कुमार रानगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
कोट
"औद्योगिक वसाहतीमध्ये पडून असलेले लाकूड व फांद्या ही वस्तू वाया जात होती. त्याचा उपयोग समाजोपयोगी कार्यासाठी व्हावा, या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. अशा प्रकारच्या संकल्पना राबवून औद्योगिक वसाहती आणि ग्रामसमाज यांच्यातील नातं अधिक दृढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे."
आय. ए. नाईक
कार्यकारी अभियंता
फोटो ओळ
गोकुळ शिरगाव येथे लाकूड दान कार्यक्रमात उपस्थित उप अभियंता अजय कुमार रानगे.सरपंच चंद्रकांत डावरे, गोशिमाचे अध्यक्ष स्वरूप कदम व इतर मान्यवर
Comments
Post a Comment