महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचा सन्मान*
*महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचा सन्मान*
प्रतिनिधी/ शेखर जधव
सातारा /जावली :-श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा मधील राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत पूरग्रस्तांना केलेल्या भरीव मदतीबद्दल महाविद्यालयाचा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील व संचालक, उच्च व तंत्र शिक्षण विभाग डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्या हस्ते आज दिनांक१९/११/२०२५ रोजी मॉडर्न कॉलेज पुणे येथे आयोजित कार्यक्रमांमध्ये सन्मान करण्यात आला.
अतिवृष्टीने मराठवाडा विभाग व सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले होते.
या परस्थितीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयांने जामखेड महाविद्यालय हे पूरग्रस्त बाधित महाविद्यालय दत्तक घेऊन विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान त्याचप्रमाणे समाजाला पुन्हा उभारी देण्यासाठी लालबहादूर शास्त्री
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत कार्यक्रमाधिकारी व सर्व सदस्यांनी मेहनत घेतली यासाठी
आपल्या महाविद्यालयाचे कुशल मार्गदर्शक प्राचार्य शेखर मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाने पूरग्रस्त मदतीसाठी केलेल्या आव्हानुसार विभागामार्फत कार्यक्रमाधिकारी एनएसएस कमिटी स्वयंसेवक यांनी आखलेल्या उपक्रमांमधून कपडे, खाद्यपदार्थ, शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदत द्वारे संकलन करून आपणास दत्तक दिलेल्या जामखेड महाविद्यालय जामखेड तेथे ही मदत पोहोचवण्यात आली या महाविद्यालयाला आपल्या मदतीचा खूप महत्वपूर्ण उपयोग झाला. आपल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी दिलेल्या सक्रिय योगदानामुळे आपल्या महाविद्यालयाचा महाराष्ट्र शासनच्या उंच व तंत्र शिक्षण विभाग यांच्या मार्फत संकटातून संकल्पकडे या शासनाच्या उपक्रमाद्वारे उत्कृष्ट मदत केल्याबद्दल हा पुरस्कार दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी मॉडर्न कॉलेज पुणे येथे वितरित करण्यात आला. माननीय तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील व उच्च व तंत्र शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळांनकर तसेच श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय कौस्तुभ गावडे साहेब इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महाविद्यालयाच्या वतीने डॉ. अविनाश नलावडे डॉ. दीपक जाधव डॉ. प्रवीण जाधव (एन.एस एस. कार्यक्रमाधिकारी) डॉ .सतीश व्यवहारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. आपल्या सगळ्यांच्या योगदानामुळे आज महाविद्यालयाचा उचित सन्मान महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत करण्यात आला.

No comments: