रोटरी क्लब ऑफ पिंपरी च्या खजानीस पदी स्मिता रानमाळे.
रोटरी क्लब ऑफ पिंपरी च्या खजानीस पदी स्मिता रानमाळे.
---------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
विजय बकरे
---------------------------------
रोटरी क्लब ऑफ पिंपरीच्या खजानासपदी सरवडे (ता. राधानगरी )येथील सौ. स्मिता मनोहर रानमाळे यांची निवड करण्यात आली. पुणे येथे कार्यरत असलेल्या सौ. स्मिता या चार्टर्ड अकाउंटंट असून भोगावतीचे माजी कार्यकारी संचालक महादेवराव तिकोडे (गुडाळकर) यांच्या सुकन्या आहेत.
या निवडी प्रसंगी रोटरी क्लबचे प्रांतपाल संतोष मराठे, सहाय्यक प्रांतपाल प्रणिता आलूरकर,रवींद्र भावे, नूतन अध्यक्ष इरफान आवटे,शितल आवटे, क्लबचे माजी अध्यक्ष आर्यन आवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी रोटरी क्लबच्या सहाय्यक प्रांतपाल प्रणिता आलुरकर यांच्या हस्ते सौ. स्मिता तिकोडे यांचा सत्कार करण्यात आला.
या निवडी बद्दल स्मिता तिकोडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
No comments: