कामधेनू दूध संस्थेच्या अध्यक्षपदी विनोद पाटील.
कामधेनू दूध संस्थेच्या अध्यक्षपदी विनोद पाटील.
कामधेनू सहकारी दूध संस्थेच्या नव्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदी विनोद पाटील यांची तर उपाध्यक्षपदी आत्माराम गायकवाड यांची एकमताने निवड करण्यात आली.
या निवड प्रक्रियेसाठी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विश्वास पाटील होते. बैठकीस संचालक शशिकांत पाटील, मोहन पाटील, सय्यद पठाण, पांडुरंग मुळीक, अधिक पाटील, संजय दाभाडे, अनिल पाटील, सर्जेराव शेटके, विभा पाटील, संतोष पाटील, सुभाष सवळेकरी, प्रकाश पाटील यांच्यासह उपसरपंच, सरपंच शिवाजी जाधव, श्रीधर पाटील, राजेंद्र मुळीक, अजित पाटील, अमर मुळीक, निवृत्ती गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
निवड झाल्यानंतर नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
No comments: