मुरगूड येथे शिवभक्तांकडून नदी काठावरील गणेश मूर्तीचे पुनर्विसर्जन.
मुरगूड येथे शिवभक्तांकडून नदी काठावरील गणेश मूर्तीचे पुनर्विसर्जन.
---------------------------------
जोतीराम कुंभार
---------------------------------
मुरगूड येथील शिवभक्त यांनी गणपती विसर्जनानंतर काठावर पुन्हा वाहून आलेल्या गणेश मूर्तींचे नदीमध्ये खोलवर जाऊन विसर्जन केले यामध्ये सार्वजनिक मंडळांच्या तब्बल पंचवीसहुन अधिक आणि 500 हून अधिक घरगुती मूर्तींचा समावेश होता कुरणी घाट आणि दत्त मंदिर घाट या दोन ठिकाणी शिवभक्तांनी हा उपक्रम राबवला सकाळी साडेपाच वाजता शिवभक्त कुरणी बंधारा येथे जमा झाले यानंतर त्यांनी सर्वप्रथम सार्वजनिक मंडळांच्या मुर्त्या खोलवर पाण्यात घेऊन जात विसर्जित केल्या त्यानंतर काठावर वाहून आलेल्या गणेश मुर्त्या मानवी साखळी करून आतमध्ये जात पुनर्विसर्जन केले याचबरोबर दोन्ही घाटांवर तब्बल दोन ट्रॉली कचरा मिळून आला हा देखील जमा करून घाटांची स्वच्छता केली. पाण्यामध्ये नागरिकांनी फोटो फ्रेम विसर्जित केल्यामुळे त्यांच्या काचा पायामध्ये लागत होत्या त्याचबरोबर गणपतीला असणारे लोखंडाचे स्ट्रक्चर आणि पायामध्ये आलेल्या गणेश मूर्ती यांची विटंबना होऊ न देता एका बाजूने सर्व गणेश मूर्ती काढून घेत त्यांना खोलवर विसर्जित करण्यात आले शिवभक्तांचा हा सल्ला दुसऱ्या वर्षीचा उपक्रम या उपक्रमाचे शहरभरातून कौतुक होत आहे विसर्जनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे अनेकांनी मुर्त्या घाटावर विसर्जित केल्या होत्या त्यामुळे घाटावर देखील मोठ्या प्रमाणात मूर्त्या जमा झाल्या होत्या या सुरक्षित आत नेऊन त्यांचे पुनविसर्जन केले या उपक्रमामध्ये शिवभक्त सामाजिक कार्यकर्त सर्जेराव भाट, रघुनाथ बोडके, अमर लोहार, ओंकार पोतदार,अमोल मेटकर, सुखदेव पाटील, नामदेव भराडे जगदीश गुरव, तानाजी भराडे, धनंजय सूर्यवंशी, संकेत शहा, विनायक मेटकर, आनंदा रामाने, शिवाजी चौगले, प्रफुल कांबळे, प्रकाश पारिषवड, पांडुरंग चौगले आनंदा मोरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते
Comments
Post a Comment