स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी मोठा टप्पा!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी मोठा टप्पा!
**************************
मुंबई : देवदास कांबळे मुक्त पत्रकार
************************
*नेत्यांची उत्सुकता शिगेला – इच्छुक उमेदवारांमध्ये धडधड वाढली*
नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाची सोडत दि. 6 रोजी.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांपूर्वी मोठी हालचाल घडणार आहे. नगरपरिषद व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांच्या आरक्षणाची सोडत येत्या *सोमवारी, 6 ऑक्टोबर रोजी मुंबईत होणार आहे.* या सोडतीनंतर निवडणूक राजकारणाचा संपूर्ण रंग बदलणार असून, सत्ताधारी व विरोधक दोघांच्याही गणितात उलथापालथ होणार आहे.
महत्त्वाचे मुद्दे :
🔹 सोडतीची तारीख व ठिकाण – 6 ऑक्टोबर, मंत्रालय, मुंबई.
🔹 सोडतीची व्याप्ती – राज्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदांसाठी आरक्षण निश्चिती.
🔹 अधिकृत माहिती – नगर विकास विभागाच्या शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवाले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
🔹 निवडणूक समीकरणे – कोणत्या नगराध्यक्ष पदावर कोणता प्रवर्ग लागू होणार, यावरून पक्षांतर्गत स्पर्धा तीव्र.
नेत्यांची उत्सुकता – कार्यकर्त्यांचा श्वास रोखला
सोडतीच्या दिवशी कोणत्या नगरपरिषदेला कोणता प्रवर्ग लागू होतो, यावरून स्थानिक राजकारणाचा चेहरा बदलतो. त्यामुळे आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्षांपासून ते ग्रामपंचायत सदस्यांपर्यंत सर्वांची नजर या सोडतीवर खिळली आहे.
*इच्छुक बाशिंग बांधून तयार*
नगराध्यक्ष होण्यासाठी तयारी करणारे अनेक इच्छुक नेते व पदाधिकारी आरक्षणामुळे बाहेर पडू शकतात. त्यामुळे काहींची स्वप्ने धुळीस मिळणार तर काहींसाठी सुवर्णसंधी निर्माण होणार आहे. अनेक ठिकाणी आतापासूनच “कुठे कोणता प्रवर्ग लागणार?” या चर्चांना ऊत आला असून, गटबाजी व बाशिंगची सुरुवात झाली आहे
राजकीय समीकरणे बदलणार
नगराध्यक्ष पदावर आरक्षण ठरल्यानंतर उमेदवारी कोणाला मिळणार, यावरून पक्षांतर्गत तणाव आणि आंतरकलह वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः महापालिका निवडणुकांपूर्वी ही सोडत राज्याच्या राजकारणाला नवा कलाटणी देणारी ठरू शकते.
👉 निष्कर्ष :
6 ऑक्टोबरला होणाऱ्या या सोडतीनंतरच अनेक नगरपरिषदांतील राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे. नेते, कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार व नागरिक यांचे लक्ष आता मुंबईतील सोडतीकडे लागले आहे.
✍️ *देवदास कांबळे*
*मुक्त पत्रकार, मुंबई*
No comments: