Header Ads

ट्रॅक्टर टॉलीच्या धडकेत पादचारी ठार — वाढदिवसानंतरच काळाने घेतले जीवन!

 ट्रॅक्टर टॉलीच्या धडकेत पादचारी ठार — वाढदिवसानंतरच काळाने घेतले जीवन!

-------------------------------------------

संस्कार कुंभार 

-------------------------------------------

पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर टोप (ता. हातकणंगले) येथील बाजार कट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात पादचारी जागीच ठार झाला. सोमवारीच वाढदिवस साजरा केलेल्या त्या व्यक्तीचा मंगळवारी संध्याकाळी झालेल्या अपघातात मृत्यू झाला.


मयताचे नाव अनंत नामदेव दरेकर (वय ४१, रा. विलासनगर, शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) असे आहे. तो मंगळवारी आपल्या बहीणीला भेटण्यासाठी टोप येथे आला होता. रस्ता ओलांडत असताना पुणेहून कोल्हापूरकडे जात असलेल्या ट्रॅक्टर टॉलीच्या मागील टॉलीची त्याला जोरदार धडक बसली. धडकेनंतर तो रस्त्यावर पडला आणि टॉलीची चाके त्याच्या छातीवरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सायंकाळी सुमारे ६.३० वाजता घडला.


अपघाताची बातमी समजताच त्याची बहीण व मित्रपरिवार घटनास्थळी धावले. बहिणीचा हंबरडा आणि मित्रांच्या डोळ्यातील अश्रू हृदय पिळवटून टाकणारे दृश्य निर्माण झाले. काही मित्रांनी सांगितले की, फक्त एक दिवसापूर्वीच त्यांनी अनंतचा वाढदिवस आनंदात साजरा केला होता, मात्र नियतीने एका क्षणात सर्व काही संपवले.


या अपघाताची नोंद शिरोली पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Powered by Blogger.