राजर्षी शाहू विकास आघाडीला जयसिंगपूर ब्राह्मण समाजाचा पाठिंबा.
राजर्षी शाहू विकास आघाडीला जयसिंगपूर ब्राह्मण समाजाचा पाठिंबा.
जयसिंगपूर नगरपालिका निवडणुकीमध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीला शहरातील ब्राह्मण समाजाने पाठिंबा दिला. यावेळी पाठिंब्याचे पत्र राजर्षी शाहू विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर यांना देण्यात आले.
प्रसंगी बोलताना संजय पाटील यड्रावकर म्हणाले, जयसिंगपूर शहराच्या सर्वांगीण विकास यापुढे करण्यासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत. शहराच्या विकासाची गंगा यापुढेही अविरत सुरू ठेवण्यासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेक जणांनी राजर्षी शाहू विकास आघाडीला पाठिंबा देऊन शहराच्या विकासाचा घटक बनत आहेत. जयसिंगपूर शहरातील ब्राह्मण समाज नेहमीच आम्हाला साथ दिली आहे. या समाजाने राजर्षी शाहू विकास आघाडीला पाठिंबा दिल्याबद्दल संजय पाटील यड्रावकर यांनी त्यांचे आभार मानले.
याप्रसंगी ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष सुधीर कुलकर्णी, रमेश यळकुडकर, मिलिंद भिडे, मदन बुरांडे, संजय कुलकर्णी, रमेश देशपांडे, विनायक अणेगिरीकर, स्नेहल कुलकर्णी, वर्षा कुलकर्णी, तेजश्री कुलकर्णी, मनीषा यळगुडकर, डॉ. उर्मिला भिडे यांच्यासह समाजातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: