गडमुडशिंगी येथे संविधान दिन उत्साहात साजरा.
गडमुडशिंगी येथे संविधान दिन उत्साहात साजरा.
"संविधान हे केवळ पुस्तकातील शब्द नाही तर तुमच्यासारख्या मुलांच्या स्वप्नातील संघर्ष आणि समतेची भूमिका आहे. संविधान वाचाल तर तुम्ही वाचाल आणि देश बदलेल."असे प्रतिपादन जागर फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा बी जी मांगले यांनी मुडशिंगी येथील संविधान सभेच्या कार्यक्रमांमध्ये केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या सरपंच सौ अश्विनी शिरगावे या होत्या.
त्यांचे भाषण संवादात्मक होते.
त्या पुढे म्हणाल्या . न्याय स्वातंत्र्य समता बंधुता या मूलभूत तत्त्वांचा अर्थ आपल्या जीवनाशी जोडून सांगत आहे. अधिकार बरोबर जबाबदारीची जाणीव आपण ठेवावी. शिक्षण आणि शिस्त या आयुष्यातील सर्वात मोठ्या दोन गोष्टी आहेत.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिक्षका उषा पाटील म्हणाल्या,"बाबासाहेबांनी संविधानामध्ये नागरिकांची कर्तव्य, अधिकार आणि मूल्ये यांची सखोल मांडणी केली आहे. त्या दृष्टीने लोकशाही ही केवळ शासन पद्धती नसून ती जीवनपद्धती झाली पाहिजेत असे जबाबदार नागरिक बना.
यावेळी प्रशांत गोंधळी यांचे देखील व्याख्यान झाले ते म्हणाले,"बाबासाहेब जे जगले ते समाजातील बहुतांशी समाजाचे जीवन जगले. त्यामुळेच संविधान हे सर्व जाती, धर्म, पंथ, पक्ष, प्रदेश या सगळ्या गोष्टींना अंगीकारणारे ठरले."संयोजक श्री भीमराव गोंधळी यांनी घटनेचे पडसाद महत्त्व विशद करताना सांगितले,"संविधानांच्या तत्त्वांचा वारसा आम्ही आज पुढच्या पिढीकडे देतोय असं मला आज ठामपणे सांगावसं वाटतं त्यावेळी शाळेतल्या मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आलं
त्यावेळी उपस्थित
मुख्याध्यापक शिंदे, विश्वनाथ भोसले,गुंडू शिंदे, महेंद्र कांबळे,
अनिल राठोड,
अर्जुन कांबळे महासचिव, अर्जुन गोंधळी महासचिव, अमोल कांबळे,संतोष कांबळे सचिव, शिवाजी कांबळे, संदीप गोंधळी, सुप्रिया गुरव, भूशिंगे मॅडम, सतेश भोसले व मुले उपस्थित होते...!

No comments: