मद्यधुंद ट्रक चालकाने दुचाकीला उडवले एक ठार: एक गंभीर जखमी.
मद्यधुंद ट्रक चालकाने दुचाकीला उडवले एक ठार: एक गंभीर जखमी.
-------------------------------
गांधीनगर:-प्रतिनिधी
उदय साळुंखे
-------------------------------
ता करवीर येथे कोल्हापूर- हुपरी रस्त्यावर महात काट्यासमोर ट्रकने मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाले. अपघात मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला. बळवंत अनंत कुलकर्णी (वय ६८) रा. इंगळी ता हातकणंगले जिल्हा कोल्हापूर, असे अपघातातील मृताचे नाव असून भारती बळवंत कुलकर्णी (वय६२) असे गंभीर जखमी पत्नीचे नाव आहे.
या अपघाताची फिर्याद सागर बाळासो पाटील रा. सरनोबतवाडी ता .करवीर यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी ,यातील मयत बळवंत कुलकर्णी हे आपल्या दुचाकीवरून एम.एच.१०ऐटी.७१६४ यावरून सकाळी पत्नीसह कोल्हापूर येथील पाहुण्यांच्या कडे गेले होते. ते पाहुण्यांना भेटून परत येताना गडमुडशिंगी येथील महात काट्याजवळ आले असता हुपरी कडे जाणाऱ्या भरधाव ट्रक क्रमांक के.ए.२२डी.९३५३ ने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली.यात बळवंत कुलकर्णी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले. तर त्यांच्या पत्नी भारती कुलकर्णी याही गंभीर जखमी झाल्या. त्यांना पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ट्रकचालक जय प्रल्हाद तिप्पे (वय ३२) रा. गायकवाडी निपाणी याला नागरिकांनी मध्य धुंद अवस्थेत असल्याने चांगलाच चोप दिला आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले . घटनास्थळी गांधीनगर पोलिसांनी धाव घेऊन जखमींना पुढील उपचारासाठी सीपीआरला पाठवले. या अपघाताची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास गांधीनगर पोलीस करीत आहेत.

No comments: