सागवान झाडांसाठी ६ हजार लाच — परतवाडा वनपाल एसीबीच्या जाळ्यात!
सागवान झाडांसाठी ६ हजार लाच — परतवाडा वनपाल एसीबीच्या जाळ्यात!
-------------------------------------फ्रंट लाईव्ह न्यूज महाराष्ट्र
पी. एन. देशमुख, अमरावती जिल्हा प्रतिनिधी.
--------------------------------------
परतवाडा (अमरावती) — सागवान झाडांना हॅमर करून रहदारी पास देण्यासाठी ६ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वनपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली.
अभय भीमसेन चंदेल (रा. काडली, परतवाडा) असे आरोपीचे नाव आहे. तक्रारदाराने म्हसोना येथे सागवान झाडे लावली असून, ती कापण्यासाठी अर्ज केला होता. पास देण्यासाठी आरोपीने लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे दाखल झाली होती.
अमरावती एसीबीच्या नीलिमा सातव यांच्या पथकाने ही कारवाई केली असून आरोपीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

No comments: