Header Ads

 एकाच पासवर दिवसभर गौण खनिज वाहतूक! — मेळघाट धारणीमध्ये महसूल बुडवणीचा धक्कादायक प्रकार.

-----------------

फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र

अमरावती जिल्हा प्रतिनिधी : पी. एन. देशमुख

------------------------

अमरावती (धारणी-मेळघाट) — मध्यप्रदेशातून येणाऱ्या रेती व मुरूम वाहतुकीत “एकाच झिरो रॉयल्टी पासवर दिवसभर फेऱ्या” मारून शासनाच्या महसुलाला लाखोंचा तोटा पोहोचवणारा प्रकार उघड झाला आहे.  तक्रार होताच तहसीलदार प्रदीप शेवाळे यांनी पथक स्थापन करून चौकशी सुरू केली असून तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.१६ किलोमीटर अंतरासाठी ८ तासांचा पास दाखवून दिवसभर खनिजांची बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याचे आढळले आहे. एस. आर. पटेल यांनी तपास वाढवून चेकपोस्ट, टोलनाके आणि वजनकाट्यांवर पडताळणी करण्याची मागणी केली आहे.धारणी येथे कारवाई सुरू असली तरी परतवाड्यात मात्र बिनबोभाट वाहतूक सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

तहसीलदार शेवाळे यांनी सांगितले की, “रॉयल्टी तपासणी करून अहवाल डीएमओ कार्यालयाकडे पाठवण्यात येईल.”

नागरिकांनी शासनाने तातडीने कारवाई करून महसूल बुडवणी थांबवावी, अशी मागणी केली आहे.

No comments:

Powered by Blogger.