दानोळी व शिरोळ बनले अवैध धंद्यांचे अड्डे! पोलिसांच्या छत्रछायेखाली , मटका,तीन पानी जुगार चा सुळसुळाट
दानोळी व शिरोळ बनले अवैध धंद्यांचे अड्डे! पोलिसांच्या छत्रछायेखाली , मटका,तीन पानी जुगार चा सुळसुळाट
जयसिंगपूर / प्रतिनिधी :नामदेव भोसले
जयसिंगपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेले दानोळी हे गाव सध्या अवैध धंद्यांचे अड्डे बनले असून, पोलिस प्रशासन मात्र डोळेझाक करत असल्याची चर्चा सर्वत्र आहे. मटका, जुगार यांसारखे धंदे जोरात फोफावत असताना संबंधित अधिकारी यांचे दुर्लक्षित पणा मुळे त्या गावात खुले अवैध धंदे चालु आहे
या भागातून दरमहा तब्बल एक लाख ते दीड लाख रुपये “हप्त्याच्या” स्वरूपात वसुली होते, असा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. ह्या पैशांच्या जोरावर पोलिसांकडून संपूर्ण भागात “मोकळे आकाश” मिळत असल्याचे बोलले जाते.जयसिंगपूर उपविभागीय पोलिस कार्यालयाच्या जवळच असलेले ‘हॉटेल अदिभवन’ हेच या सर्व धंद्यांचे “कमांड सेंटर” असल्याची चर्चा आहे. इथूनच सगळे धंदे “रिमोट कंट्रोल”वर चालतात, असे पोलिस वर्तुळात बोलले जाते.
कोल्हापूर जिल्ह्यात मटका बंद — पण दानोळीत व शिरोळ मध्ये खुलेआम!
पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात मटका व्यवसाय बंद असतानाही शिरोळ व दानोळी गावात मात्र तो खुलेआम सुरू आहे. इतकेच नव्हे, तर मुंबई सट्ट्याचे लोडिंगही याच गावातून केले जाते, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे
अवैध धंदे करणाऱ्यांकडून काही पोलिसांना दरवर्षी “दिवाळीचे जाड पाकीट” मिळते, असेही स्थानिक नागरिक सांगतात. परिणामी या गावात कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही
शिरोळ तालुक्यात गेल्या काही महिन्यांत खून, चोरी, फसवणूक, अवैध व्यवसाय या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. जयसिंगपूर येथे पोलिस उपविभागीय कार्यालय असतानाही, या भागात गुन्हेगारांचा वचक वाढत चालला आहे.
— “अवैध धंदे रोखलेच पाहिजेत!”
स्थानिक नागरिकांचा संयम आता संपत चालला आहे. त्यांनी प्रशासनाकडे संपूर्ण शिरोळ तालुका दानोळी व कवठेसार भागातील अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची मागणी करत आहे,

No comments: