कळे पोलीस ठाण्याचे वतीने आज रक्तदान शिबीर.
कळे पोलीस ठाण्याचे वतीने आज रक्तदान शिबीर.
-------------------------------
कळे प्रतिनिधी
साईश मोळे
-------------------------------
कळे ता पन्हाळा येथे आज बुधवार दि 26 नोव्हेंबर रोजी मुंबईवरील हल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी व जवानांना आदरांजली वाहण्यासाठी कळे पोलिस ठाणे व पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघ व पन्हाळा तालुका पोलीस पाटील संघटना यांचे वतीने रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले आहे . कळे पोलीस ठाणे येथे सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत हे शिबीर होणार आहे . यावेळी रक्तदान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रमाणपत्र व कार्ड दिले जाणार असुन कार्डवर कुटूंबासाठी मोफत रक्त मिळणार आहे . तसेच प्रत्येक सहभागी व्यक्तीला पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघ यांचे वतीने भेटवस्तू दिली जाणार आहे . रक्तदान शिबीराचे सातवे वर्ष असुन आजपर्यत या शिबीरात दोन हजार बॅग रक्त संकलण झाले आहे . यामुळे समाज्यातील गरजू गरीब सुमारे 300 रुग्णांना मोफत रक्त दिले आहे .तरी या शिबीरात परिसरातील तरुणांनी सहभागी व्हावे .असे अहवान कळे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा . दिपक कदम यांनी केले आहे .
चौकट - मुंबईवरील हल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व जवानांना आदरांजली वाहण्यासाठी एक सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान व आरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे .यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे .
मा . दिपक कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक कळे पोलीस ठाणे

No comments: