तावडे हॉटेल जवळील कमान पाडणार; ६ नोव्हेंबरच्या रात्री वाहतुकीत मोठा बदल!
तावडे हॉटेल जवळील कमान पाडणार; ६ नोव्हेंबरच्या रात्री वाहतुकीत मोठा बदल!
कोल्हापूर (सलीम शेख ): कोल्हापूर महानगरपालिकेने तातडीची सूचना देत कळवले आहे की, आज गुरुवार, दिनांक ६ नोव्हेंबर रोजी रात्री १०:०० वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६:०० वाजेपर्यंत तावडे हॉटेल जवळची कमान पाडण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे या मार्गावरील वाहतुकीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
वाहतूक पोलिसांच्या समन्वयाने खालीलप्रमाणे वाहतूक वळविण्यात आली आहे.
कोल्हापुरात प्रवेश करणारी वाहतूक तावडे हॉटेल मार्गे शहरात येणारी सर्व वाहने या वेळेत उचगाव मार्गे वळविण्यात येतील.
शहरातून बाहेर पडणारी वाहतूक शहरातून तावडे हॉटेल मार्गे बाहेर जाणारी वाहतूक छत्रपती ताराराणी चौकातून बावडा रोडने शिये मार्गे वळवण्यात येणार आहे.
तरी, नागरिकांनी या कालावधीत कोल्हापूर शहरात येताना किंवा शहरातून बाहेर जाताना या वाहतूक बदलांची नोंद घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments: