💥 चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीचा खून; प्रियकरानेच गळा आवळून संपवले प्रेमसंबंध
💥 चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीचा खून; प्रियकरानेच गळा आवळून संपवले प्रेमसंबंध
इस्लामपूर :
प्रेमसंबंधातून सुरू झालेलं नातं चारित्र्याच्या संशयावरून थेट खुनापर्यंत पोहोचल्याची थरारक घटना इस्लामपूर तालुक्यात उघडकीस आली आहे. रसिका मल्लेश कदम (वय ३५, रा. इस्लामपूर) या विवाहितेचा मृतदेह कृष्णा नदीपात्रात आढळून आल्याने खळबळ उडाली असून, तिचा प्रियकर तुकाराम शंकर वाटेगावकर (वय ३८) यानेच तिचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
🔹 पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद – गळा आवळून खून
रसिका या खानावळीत धुणीभांडी करत होत्या. तिचा नवरा कर्नाटकमध्ये कामाला होता. पैशांच्या व्यवहारातून आणि अनैतिक संबंधातून तुकाराम याच्याशी तिचे संबंध निर्माण झाले होते. मात्र, अलीकडे दोघांमध्ये मतभेद वाढले.
मंगळवारी रात्री तुकाराम इस्लामपुरात रसिकाच्या घरी गेला. पैशांचे आमिष दाखवून तो तिला दुचाकीवर बसवून बोरगावजवळील आपल्या वस्तीवर घेऊन गेला. तेथे रात्री उशिरा चारीत्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला. रागाच्या भरात तुकारामने रसिकाचा गळा आवळून तिचा खून केला.
त्यानंतर मृतदेह पोत्यात भरून तो रसिकाच्याच दुचाकीवरून ताकारी परिसरातील कृष्णा नदीपात्रात नेऊन फेकून दिला. दुसऱ्या दिवशी (बुधवारी) तुकाराम स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला आणि गुन्ह्याची कबुली दिली.
या भीषण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तुकारामला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.

No comments: