Header Ads

निमसाखर परिसरात पाच महिन्याच्या कांद्याची लागवड जोमात – शेतकऱ्यांचा उत्साह, बाजारभावाबाबत मात्र संभ्रम.

 निमसाखर परिसरात पाच महिन्याच्या कांद्याची लागवड जोमात – शेतकऱ्यांचा उत्साह, बाजारभावाबाबत मात्र संभ्रम.

-------------------------------------------

फ्रंट लाईव्ह न्यूज महाराष्ट्र

निमसाखर ता. इंदापूर

 श्री गणेशराव धनवडे, 

-------------------------------------------

इंदापूर तालुक्यातील निमसाखर गाव व परिसरात सध्या पाच महिन्याच्या कांद्याची लागवड जोमात सुरू आहे. शेतकऱ्यांनी फेक कांदा विस्कटून नव्याने रोपे टाकण्याचे काम वेगाने हाती घेतले असून, पहाटेपासूनच शेतात मोठ्या प्रमाणावर मजूर कामाला जात आहेत.


या वर्षी पावसाचा अनियमित पॅटर्न आणि बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांना कांदा लागवड थोडी उशिरा करावी लागली. मात्र आता जमिनीतील ओलावा आणि हवामानाची स्थिती अनुकूल झाल्याने पाच महिन्याच्या कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. योग्य वेळी लागवड झाल्यास उत्पादन चांगले मिळते, अशी माहिती निमसाखर येथील शेतकरी श्री युवराज सर्जेराव रणमोडे यांनी दिली.


रणमोडे यांनी सांगितले की, “आमच्या परिसरामध्ये श्री राजाराम बाबुराव दळवी हे अत्यंत चांगल्या पद्धतीने कांदा बी विस्कटून देतात. त्यामुळे कांद्याची उगवण समान होते आणि रोपे तगडी होतात,” असे ते म्हणाले.


काही शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीचा अवलंब करत ड्रिप सिंचनाचा वापर सुरू केला आहे. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होत असून, कांद्याच्या वाढीवर सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


दरम्यान, बाजारभावातील सततच्या चढ-उतारामुळे शेतकरी चिंतेत असले तरी, योग्य उत्पादन मिळाल्यास परिस्थिती सुधारेल, अशी आशा शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे.


निमसाखर व परिसरातील शेतकऱ्यांमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण असून कांदा रोपांची लावणी पूर्ण क्षमतेने सुरू आहे.

No comments:

Powered by Blogger.