मरळी–कळे परिसरात तीन ठिकाणी दुकानफोडी.
मरळी–कळे परिसरात तीन ठिकाणी दुकानफोडी.
-----------------------------------
कळे प्रतिनिधी
साईश मोळे
-----------------------------------
कळे : मरळी आणि कळे परिसरात चोरट्यांनी एका रात्रीत तीन ठिकाणी दुकानफोडी करत एकूण २,०८० रुपयांची रोख रक्कम लंपास केली. या प्रकरणी निखिल हरीराम पोवार (रा. मरळी) यांनी कळे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी निखिल पोवार यांचे कोल्हापूर–गगनबावडा मार्गावर रेवा इलेक्ट्रॉनिक नावाचे इलेक्ट्रिक साहित्य विक्रीचे दुकान आहे. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला व रोख ५८० रुपये चोरून नेले.
त्याचप्रमाणे मरळीतच राजाराम पंडित पाटील यांच्या मंगलमूर्ती चायनिज दुकानातील ८०० रुपये चोरट्यांनी लंपास केले. तर कळे येथे विरसेन पाटील (भामटे) यांच्या डील दवा बाजार या औषध दुकानातील ७०० रुपयांची चोरी झाली.
सदर तीनही घटनांमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

No comments: