Header Ads

जयसिंगपूरची विकासगंगा अविरत सुरू ठेवण्यासाठी शाहू आघाडीला साथ द्या : संजय पाटील यड्रावकर प्रभाग ९ मधील प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद.

 जयसिंगपूरची विकासगंगा अविरत सुरू ठेवण्यासाठी शाहू आघाडीला साथ द्या : संजय पाटील यड्रावकर प्रभाग ९ मधील प्रचार फेरीला मोठा प्रतिसाद.


जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजर्षी शाहू विकास आघाडीला मोठा प्रतिसाद मिळत आहेत. आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील यड्रावकर तसेच प्रभाग क्रमांक ९ चे नगरसेवक पदाचे उमेदवार अशोक मळगे व तबसूम फरास यांच्या प्रचार दौऱ्याला प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्येक प्रभागातून उमेदवारांचे स्वागत करण्यात येत असून नागरिकांमध्ये निवडणुकीबाबत उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.


प्रभाग क्रमांक ९ मधील प्रचार दौऱ्यात मतदारांशी संवाद साधताना संजय पाटील यड्रावकर यांनी शहराच्या मागील काही वर्षांत झालेल्या विकासकामांचा आढावा घेत राजर्षी शाहू विकास आघाडीने जयसिंगपूर शहराच्या प्रगतीसाठी सातत्याने काम केले असल्याचे सांगितले. जयसिंगपूर शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात मोठी विकासकामे पूर्ण झाली असून, आणखी भरीव निधी आणून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे आम्ही ध्येय ठेवले आहे.  पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, क्रीडांगणे, आरोग्य सुविधा आणि नागरिकांसाठी मूलभूत सोयीसुविधांची उभारणी व या क्षेत्रांत आघाडीने केलेल्या कामांची माहिती नागरिकांना दिली.  ही विकासगंगा अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी राजर्षी शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांना जिंकून देणे आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रभागातील महिलांनी, ज्येष्ठ नागरिकांनी आणि तरुणांनी उमेदवारांचे मनापासून स्वागत करत त्यांच्यावर विश्वास असल्याचे व्यक्त केले. नागरिकांनी यड्रावकर यांच्या नेतृत्वावर समाधान व्यक्त करत या निवडणुकीत आघाडीला मोठ्या मताधिक्याने विजय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला.

या प्रसंगी सतीश मलमे, मिलिंद भिडे, रमेश यळगुडकर, संभाजी मोरे,  शिवाजी कुंभार, डॉ. अतिक पटेल, वतन पठाण, मिलिंद शिंदे, आबिद गवंडी, विनायकय गायकवाड, अप्पा घोरी, असद शेख, जुबेर शेख, संजय कलकुटगी, सुकुमार काळे, गणेश चौगुले, रमेश मळगे, राजू शेख, अरुण लाटवडे, बाळासाहेब गावडे, सर्जेराव भंडारे, बाळू सकट, चंद्रकांत भंडारे राजू हडपद, नंदकुमार आवळे, संजय आवळे, सतीश भंडारे, रमेश गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.