Header Ads

मलकापूर येथे एस.टी. बसथांबा व रात्री १० वाजेची बससेवा सुरू करण्याची मागणी.

 मलकापूर येथे एस.टी. बसथांबा व रात्री १० वाजेची बससेवा सुरू करण्याची मागणी.

-----------------------------

मलकापूर प्रतिनिधी 

रोहित पास्ते

-----------------------------

मलकापूर शहरातील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्या दृष्टीने एस.टी. बससेवा अत्यंत महत्त्वाची असतानाही, जुन्या एस.टी. स्टँड, मलकापूर येथे अनेक वेळा बस न थांबल्याने प्रवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.


कोल्हापूर–मलकापूर मार्गावर काही बससेवा उपलब्ध असल्या तरी रात्रीची बससेवा नसल्यामुळे प्रवाशांची अडचण अधिक वाढत आहे. त्यामुळे कोल्हापूरहून मलकापूरकडे रात्री १० वाजता बससेवा सुरू करावी, तसेच मलकापूर येथे अधिकृत एस.टी. बसथांबा मंजूर करावा, अशी मागणी मलकापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. रश्मी शंतनू कोठावळे यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे निवेदनाद्वारे केली आहे.


या सुविधांचा लाभ झाल्यास शहरातील नागरिकांसह विद्यार्थ्यांना व नोकरदारांना सुरक्षित व सुलभ प्रवासाची सुविधा मिळणार असून खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


यावेळी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील, नगरसेवक व नागरिक उपस्थित होते. सर्वांनी एस.टी. प्रशासनाने या मागण्यांचा सकारात्मक विचार करून योग्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

No comments:

Powered by Blogger.