सरनोबतवाडी येथील विकास विद्यामंदिर शाळेच्या प्रवेशद्वार कमानीचे भव्य उद्घाटन.
सरनोबतवाडी येथील विकास विद्यामंदिर शाळेच्या प्रवेशद्वार कमानीचे भव्य उद्घाटन.
---------------------------------------
सरनोबतवाडी प्रतिनिधी
---------------------------------------
सरनोबतवाडी येथील विकास विद्यामंदिर प्राथमिक शाळेच्या सौंदर्यात भर घालणारी भव्य व आकर्षक प्रवेशद्वार कमान लोकनियुक्त सरपंच सौ. शुभांगी किरण आडसूळ यांनी स्वखर्चातून बांधून दिली आहे. तसेच या कमानीसाठी आवश्यक गेटचा खर्च ग्रामपंचायत सदस्य श्री. बंडू खोत यांनी दिला आहे.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 26 जानेवारी रोजी या कमानीचे उद्घाटन भव्य आणि दिव्य आतिशबाजीच्या साक्षीने पार पडले. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माननीय सरपंच सौ. शुभांगी किरण आडसूळ उपस्थित होत्या. यावेळी उपसरपंच अपर्णा स्वामी तसेच ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. संतोष गजबर, उपाध्यक्ष प्रियांका पाटील, श्री. के. डी. माने व समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
तसेच शाळेचे मुख्याध्यापक अंबादास बडे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, गावातील ग्रामस्थ, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कमानीमुळे शाळेच्या प्रवेशद्वाराला भव्य व आकर्षक स्वरूप प्राप्त झाले असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींनी शाळेच्या विकासासाठी केलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

No comments: