एसटी कामगारांनी भविष्याच्या दृष्टिकोनातून सुरक्षित गुंतवणूक करणे गरजेचे सयाजीराव पाटील
एसटी कामगारांनी भविष्याच्या दृष्टिकोनातून सुरक्षित गुंतवणूक करणे गरजेचे सयाजीराव पाटील.
----------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी विजय बकरे.
-----------------------------------
एसटी कामगारांनी भविष्याच्या दृष्टिकोनातून सुरक्षित गुंतवणूक करणे गरजेचे असल्याचे स्टेट बँक ऑफ इंडिया चे आर्थिक सल्लागार सयाजीराव पाटील यांनी संभाजीनगर एसटी आगार मार्फत एक मे कामगार दिनानिमित्त आयोजित केलेल्या संयुक्त कार्यक्रमात बोलताना केले
तसेच एक मे कामगार दिनानिमित्त संभाजीनगर एसटी आगारामध्ये आगारप्रमुख दयानंद पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आला यावेळी संभाजीनगर एसटी आगारातील विना अपघात केलेल्या 27 एसटी चालकांचा सत्कार आगार प्रमुख दयानंद पाटील यांच्या हस्ते प्रशस्त पत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच कामगार दिनानिमित्त एसटी आगारामध्ये आरोग्य शिबिर व ओम हॉस्पिटल च्या डॉक्टर सौ डांगे यांच्यामार्फत नेत्र तपासणी करण्यात आली व एसटीचे कर्मचारी व अधिकारी यांना कामगार चे कायदे विषयक मार्गदर्शन श्री वाघमारे यांनी केले
या कार्यक्रमास भारती विद्यापीठाच्या वैद्यकीय विभागाचे डॉक्टर प्रणोती चिले सुरज रागनेकर कामगार कल्याण फुलेवाडी केंद्राचे सहायक संचालक दीपक गाव राखे व संभाजीनगर एसटी आगाराचे आगार व्यवस्थापक दयानंद पाटील आगार व्यवस्थापक स्वप्निल पाटील स्थानक प्रमुख सुरेश शिंगाडे वाहतूक निरीक्षक अनिल सुतार सहायक वाहतूक निरीक्षक दिलीप गावडे कार्यशाळा अधीक्षक राहुल पाटील ऋतिका इंगवले तसेच एसटी आगारातील अधिकारी कर्मचारी कामगार वर्ग मोठ्या संख्येने हजर होता

No comments: