हरवलेले ८० मोबाईल शोधून सातारा पोलिसांचा ‘टेक्नो’ पराक्रम!
हरवलेले ८० मोबाईल शोधून सातारा पोलिसांचा ‘टेक्नो’ पराक्रम!
१६ लाखांचा मुद्देमाल मालकांच्या ताब्यात; नागरिकांकडून पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव.
-------------------------------------------------
सातारा | जिल्हा प्रतिनिधी : अमर इंदलकर.
-------------------------------------------------
सातारा शहर पोलिसांनी तांत्रिक तपास आणि चिकाटीच्या जोरावर तब्बल १६ लाख रुपये किमतीचे ८० हरवलेले मोबाईल शोधून काढत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. हरवलेले मोबाईल पुन्हा मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असून पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलीस अधीक्षक Nikhil Pingale, अप्पर पोलीस अधीक्षक Dr. Vaishali Kadukar आणि उपविभागीय पोलीस अधिकारी Rajiv Navale यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक Sachin Mhetre व सहाय्यक पोलीस निरीक्षक Avinash Mane यांनी विशेष शोधमोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या.
डी.बी. पथकाने केंद्र सरकारच्या CEIR Portal तसेच इतर आधुनिक तांत्रिक साधनांचा वापर करून महाराष्ट्रासह इतर राज्यांतील मोबाईलधारकांशी सातत्याने संपर्क साधला. या प्रयत्नांतून फेब्रुवारी व मार्च २०२६ या कालावधीत हरवलेले ८० स्मार्टफोन हस्तगत करण्यात यश आले.
दि. १२ मे २०२६ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी Rajiv Navale यांच्या उपस्थितीत सर्व मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्यानंतर अनेक नागरिकांनी पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
सातारा शहरात दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असते. बसस्थानके, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणी मोबाईल हरवण्याच्या घटना नेहमी घडत असतात. मात्र सातारा पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि तांत्रिक कौशल्यामुळे नागरिकांचा पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिकच दृढ झाला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक Sachin Mhetre, सहाय्यक पोलीस निरीक्षक Avinash Mane, पोलीस उपनिरीक्षक Sudhir More, डी.बी. पथक तसेच सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या यशस्वीपणे पार पाडली.

No comments: