Header Ads

डी सी नरके कॉलेजमध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी.

 डी सी नरके कॉलेजमध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी

-----------------------------
कुडित्रे प्रतिनिधी.
---------------------------
 कुडित्रे. (ता. करवीर) येथील डी सी नरके ज्युनिअर कॉलेजमध्ये लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डी एस चौगले सर होते. "छ. शाहू महाराज हे आधुनिक भारताच्या लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेचे अग्रदुत होते. त्यांनी आपल्या राज्यसत्तेचा उपयोग जनतेच्या सर्वांगीण विकासाठी केला. त्यांचे हे कार्य विद्यार्थ्यांनो आपआपल्या बुद्धिकौशल्याने आपण 

सर्वजण पुढे चालू ठेवूया असे प्रतिपादन यावेळी बोलताना त्यांनी केले. यावेळी विभाग प्रमुख प्रा. एम बी मोहिते उपस्थित होते.

       या कार्यक्रमाच्या निमित्ताने "लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज" या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केली होते. या स्पर्धेत पुढील विद्यार्थींनींनी अणुक्रमे यश संपादन केले

 १) कु ऋतुजा सखाराम बरगे

२) कु दिव्या रंगराव पाटील

३) कु सायली अशोक मोहिते

       या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा जे डी लव्हटे व प्रा एन बी पाटील मॅडम यांनी काम पाहिले.

            या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा पी जे पाटील यांनी केले. सूत्रसंचलन प्रा. ए एस मुल्ला यांनी तर आभार प्रा.एच एस बंगे यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी, सर्व विद्यार्थी विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.