Header Ads

जुन्नरमध्ये दारू पिऊन थार चालवणाऱ्यास १० हजारांचा दंड.

 जुन्नरमध्ये दारू पिऊन थार चालवणाऱ्यास १० हजारांचा दंड. 

------------------
कैलास बोडके.
-----------------

ओतूर (प्रतिनिधी )दारू पिऊन भरधाव वाहन चालवणाऱ्या इसमास जुन्नर न्यायालयाने सोमवारी 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. या कारवाईमुळे परिसरात दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.  

ओतूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८जून रोजी सकाळी १०:३० वाजता ओतूर येथील मोनिका चौकात संजय कोंडाजी तांबे (वय ४७, रा. ओतूर) हा दारूच्या नशेत महिंद्रा थार क्रमांक एम. एच १४ एल. ई. ११२४ ही चालवताना आढळला. तो ओझर बाजूकडून ओतूरकडे येत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र, ओतूर येथे वैद्यकीय तपासणी केली. तपासणीत तो मद्यधुंद असल्याचे निष्पन्न झाले.  

याप्रकरणी सरकारतर्फे फिर्याद देऊन तांबे याच्याविरुद्ध मोटार वाहन कायदा कलम १८५ नुसार  दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर जुन्नर न्यायालयाने २९ जून रोजी त्याला १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.  

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, पोलीस हवलदार नामदेव बांबळे,शाम जायभाये, किशोर बर्डे यांनी केली आहे.

"दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर आता कठोर कारवाई होणार आहे. यापुढे पकडल्यास दंडासोबत कारावासाची शिक्षाही भोगावी लागेल," असा इशाराही सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला.

No comments:

Powered by Blogger.