Header Ads

विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती साजरी...

 विश्वासराव रणसिंग महाविद्यालयात स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती साजरी...

~~~~~~~~~~~~~~~~~~~~
इंदापूर प्रतिनिधी गणेश धनवडे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता. इंदापूर महाविद्यालयात स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती अभिवादन व स्मरण कार्यक्रमाने साजरी करण्यात आली. संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी विनम्र अभिवादन केले.

कार्यक्रमात संस्थेचे सचिव विरसिंह रणसिंग यांनी स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या कर्तृत्वपूर्ण नेतृत्वाचा विशेष उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, अजितदादा हे विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारे, निर्णयक्षम, शिस्तप्रिय आणि कणखर नेतृत्व होते. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी ते नेहमीच कटिबद्ध राहिले. त्यांच्या कार्यपद्धतीत वेळेचे नियोजन, प्रशासनावरील पकड आणि विकासकामांबाबतची तळमळ स्पष्टपणे दिसून येत होती.

रणसिंग म्हणाले, "अजितदादा हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर सामान्य माणसाचा आधारवड होते. त्यांच्या कार्यातून नव्या पिढीने शिस्त, प्रामाणिकपणा आणि लोकसेवेची प्रेरणा घ्यावी."

कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. अशोक काळंगे,उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग ,उपप्राचार्य डॉ.प्रशांत शिंदे इ मान्यवर व प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या कार्याला कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.

No comments:

Powered by Blogger.