Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

15 ऑगस्ट, 2023 स्वातंत्र्य दिन साजरा .

 15 ऑगस्ट, 2023 स्वातंत्र्य दिन साजरा .

 जिल्हा परिषद कोल्हापूर येथे दिनांक मंगळवार 15 ऑगस्ट, 2023 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन साजरा करणेत आला. यावेळी ठिक 08.00 वाजता संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक जिल्हा परिषद कोल्हापूर यांचे शुभ हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रगीत व राज्यगीताचे गायण करणेत आलेे. जिल्हा परिषद कलामंचच्या वतीने देशभक्तीपर गीत सादर करुन कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यानंतर आरोग्य विभागामार्फत तंबाखूजन्य पदार्थ विरोध शपथ घेणेत आली.

  सदर ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक, सुषमा देसाई , सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विलास पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अरुण जाधव, कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर, प्रभारी कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा एस. ए. बारटक्के, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय रणवीर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) एकनाथ आंबोकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मीना शेंडकर, शिक्षणाधिकारी (योजना) अनुराधा म्हेत्रे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी दिपक घाटे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर, कृषि विकास अधिकारी अभयकुमार चव्हाण व सर्व विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments