Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राधानगरी येथे दोन किराणा मालाचे व एका घराचा दरवाजाचे कुलूप तोडले तर दोन किराणामालाच्या दुकानांमधील 21 हजाराची चोरी व्यापारांच्या मध्ये, घबराटीचे वातावरण.

 राधानगरी येथे दोन किराणा मालाचे व एका घराचा दरवाजाचे कुलूप तोडले तर दोन किराणामालाच्या दुकानांमधील 21 हजाराची चोरी व्यापारांच्या मध्ये,  घबराटीचे वातावरण.

राधानगरी बाजारपेठेत असणारे एक किराणा दुकान हार्डवेअर दुकान या दुकानावर या दोन दुकानांमधील 21हजार रुपये रो ख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून घेऊन फरारी झाले आहेत दोन व्यापारांच्या मध्ये चोरी झाल्यामुळे व्यापार मध्ये एकच खळबळ उडाली आहे.

राधानगरी बाजारपेठेत भरत विजय बोंबाडे हे गुरुवारी रात्री दहा वाजता आपले किराणा मालाचे दुकान बंद करून घरी गेले होते शुक्रवारी सकाळी सात वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना आपल्या दुकानांचा अज्ञात चोरट्याने दुकानाचे कुलूप तोडून दुकानांमध्ये प्रवेश केला व गल्ल्यांमध्ये असणारे सहा हजार रुपये रोख रक्कम चोरट्याने चोरून नेली असल्याचे निदर्शनात आले.

तसेच शेजारी असणारे अमोल बाळासाहेब आडके यांचे हार्डवेअरचे दुकान असून ते गुरुवारी रात्री नऊ वाजता बंद करून घरी गेले होते ते पण सकाळी साडेसात वाजता दुकान उघडण्यासाठी आले असता  त्यांनाही आपल्या दुकाना चे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून दुकानांमध्ये प्रवेश केला पण त्या चोरट्याने गल्ल्यांमध्ये असणारे 15000 रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले या संदर्भात बोंबाडे व आडके या दोन्ही दुकानदाराने पोलीस तक्रार करून सुद्धा तीन तासाने पोलीस घटनास्थळी दाखल झाले संबंधितांचे माहिती घेऊन तपास केला जाईल असे पोलिसाकडून सांगण्यात आले समजते .

तसेच मेन रोडवर असणारे दत्तात्रय निले त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करून तिजोरीचे लॉक तोडून त्यामध्ये असणारे कपडे  विस्कटलेली आहेत पण काही वस्तू पैसे हाती लागले नाही

तसेच राधानगरी मेन रोडवर असणारी डांबावरील स्टेट लाईट बंद असल्याचा फायदा अज्ञात चोरट्याने चोरी केल्या असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे तरी त्या स्टेटलाईट तातडीने चालू कराव्यात व राधानगरी बाजारपेठेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थ कडून होत आहे

याबाबत अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहेत

Post a Comment

0 Comments