सहाय्यक निबंधक वर्ग 2 पदी श्री. राजेंद्र भानसे यांची नियुक्ती.
सहाय्यक निबंधक वर्ग 2 पदी श्री. राजेंद्र भानसे यांची नियुक्ती.
गोडोली भागात असलेल्या मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात पुर्ण वेळ अधिकारी नेमण्यात आल्याने नागरिकांच्या मुद्रांक नोंदणी मध्ये गतिमानता येणार आहे . भानसे यांनी यापूर्वी कोल्हापूर, सांगली, आष्टा, इचलकरंजी याठिकाणी काम केले आहे. सन 2021 मध्ये पदोन्नती मिळाली. नागरिकांच्या कामाचा निपटारा वेळेत करण्यात येणार आहे. शासनाचा महसुल वाढविण्यासाठी कामात गतिमानता आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. भानसे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्रचे वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. भानसे म्हणाले की, या कार्यालयात कामाचा वेग जादा प्रमाणात असल्याने दस्त नोंदणीसाठी हेलपाटे मारावे लागू नयेत यासाठी शक्यतो ज्या त्या दिवशी काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील.
Comments
Post a Comment