Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

टाकळीवाडी येथे 350 वृक्ष जगवण्यासाठी सैनिक असोसिएशन व 13 ऑपरेशन होऊन सुद्धा माजी सैनिकाची वृक्ष जगवण्यासाठी धडपड....

 टाकळीवाडी येथे 350 वृक्ष जगवण्यासाठी सैनिक असोसिएशन व 13 ऑपरेशन होऊन सुद्धा माजी सैनिकाची वृक्ष जगवण्यासाठी धडपड....

-------------------------------------------------------------

------------------------------------------------------------

सांगवडे प्रतिनिधी /-टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील सैनिक असोसिएशनने कारगिल विजय दिनानिमित्त टाकळीवाडी गावामध्ये 350 वृक्ष लागवड केले होते.

सध्या पावसाने दांडी मारल्यामुळे भरपूर ऊन असल्यामुळे झाडे जगवण्यासाठी सैनिक असोसिएशन चे माजी सैनिक स्वतः बादली घेऊन झाडांना पाणी घालत आहेत. देशसेवे बरोबर समाजकार्यात अग्रेसर असणारे सैनिक असोसिएशन नेहमी सामाजिक बांधिलकी जपत आलेली आहे.जिथून पाणी मिळेल तिथून पाणी आणून झाडांना पाणी घालत आहेत. ऊन फार असल्यामुळे झाडांना पाण्याची फार आवश्यकता लागत आहे.मोहन निर्मळे यांची 13 ऑपरेशन झाली आहेत. तरीसुद्धा त्यांची वृक्ष जगवण्याची धडपड चालू आहे. तसेच दादा खोत हे सुद्धा माजी सैनिक असून नेहमी समाजकार्यात यांचा फार मोठा मोलाच योगदान आहे.

 या कार्यामुळे सैनिक असोसिएशनचे सर्वत्र कौतुक होत आहे व यातून अनेकांना प्रेरणा मिळेल.

Post a Comment

0 Comments