Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

नियोजनाचा निधी मार्चपर्यंत शंभर टक्के खर्च करा, गेल्या वर्षी निधी 99.71 टक्के खर्च, यावर्षी 460 कोटी आराखडा - पालकमंत्री शंभूराजे देसाई.

 नियोजनाचा निधी मार्चपर्यंत शंभर टक्के खर्च करा, गेल्या वर्षी निधी 99.71 टक्के खर्च, यावर्षी 460 कोटी आराखडा - पालकमंत्री शंभूराजे देसाई.

गतवर्षी जिल्हा सर्वसाधारण साठी 411 कोटी निधी अर्थसंकल्पात करण्यात आला होता.99.71 टक्के निधी यंत्रणांनी खर्च केला आहे. यावर्षी 460 कोटींचा आराखडा असुन हा निधी सर्व यंत्रणांनी समन्वयाने 100 टक्के खर्च करावा यासाठी आतापासूनच नियोजन करा अशी सूचना पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी केली. सातारा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री बोलत होते. सदरची बैठक नियोजन भवनात झाली. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार चव्हाण, अरुण लाड, शशिकांत शिंदे, महेश शिंदे , मकरंद पाटील, दिपक चव्हाण, जयकुमार गोरे प्रभारी जिल्हाधिकारी जीवन गलांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदीती भारद्वाज, जिल्हा नियोजन अधिकारी माळी, समाजकल्याण अधिकारी नितीन उबाळे यांच्या सह विविध अधिकारी उपस्थित होते.  जिल्हा वार्षिक योजनेच्या साठी 460 कोटी, अनुसूचित जाती घटक योजना 81 कोटी, आदिवासी जाती घटक एक कोटी 63 लाख,असा 2023-24 साठी 542 कोटी 63लाख असा अर्थसंकल्पीत निधी करण्यात आला आहे. सर्व यंत्रणांनी त्यांच्या कडील कामे प्रस्तावित करताना लोकप्रतिनिधी यांना विचारात घ्यावे. यंत्रणांनी उपलब्ध निधी विहीत मुदतीत आणि विहित कार्यपद्धती प्रमाणे खर्च करण्यासाठी काटेकोर नियोजन करावे, मंजूर निधी कोणत्याही परिस्थितीत परत जाणार नाही याची दक्षता घ्यावी. वार्षिक योजनेअंतर्गत करण्यात येणारी कामे गुणवत्ता पुर्ण असलीच पाहिजेत यासाठी यंत्रणांनी दक्षता घ्यावी. रस्ते तयार झाल्यानंतर अल्पावधीतच खड्डे पडणे ही बाब अत्यंत गंभीर व चुकीची असुन गुणवत्ता पुर्ण कामे न करणारे  ठेकेदारांवर कारवाई करावी. या बैठकीपूर्वी डोंगरी विकास आराखडा बाबत बैठकही पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत ‌नवीन अशासकीय सदस्य शारदा जाधव, मानसिंग शिंगटे,व फत्तेसिंह पाटणकर यांचा सत्कार करण्यात आला. 2023-24 साठी डोंगरी विभागांतर्गत 19 कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला. विकासकामांना मान्यता देण्यासाठी व यादी तयार करण्यासाठी 15 सप्टेंबर पर्यंत मुदत दिली आहे.  नियोजन समितीची बैठक संपल्यानंतर पालकमंत्री शंभूराजे देसाई पत्रकारांशी संवाद साधणार होते. मात्र त्याचवेळी विविध प्रकारचे निवेदने ‌घेउन‌ ग्रामीण भागातील नागरिक नियोजन भवनात शिरले त्यामुळे एकच गर्दी होऊन गोंधळ उडाला. त्यामुळे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी पोलिस अधीक्षक , जिल्हाधिकारी व  अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांच्यावर भडकले तसेच प्रांताधिकारी ,, तहसीलदार यांना झापले. त्यामुळे पोलिस अधिकारी व इतर अधिकारी यांची तारांबळ उडाली.

Post a Comment

0 Comments