Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांची चौकशी करण्याचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक सातारा यांचे प्रशासनास आदेश.

 मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांची चौकशी करण्याचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक सातारा यांचे प्रशासनास आदेश.


----------------------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा जिल्हा प्रतिनिधी

 किरण अडागळे 

----------------------------------------------------------

दिनांक ३१ जुलै रोजी जिल्हा परिषद सातारा येथील  वाखरी तालुका फलटण येथील एका विद्यालयातील विद्यार्थी व पालक यांच्या मोर्चाचे चित्रीकरण करण्यास मज्जाव करून मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी व त्यांचे अंगरक्षक पोलिस लाड यांनी केला. व पत्रकार किरण अडागळे फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र सातारा जिल्हा प्रतिनिधी यांना अर्वाच्य भाषेत बोलले तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पीए देसाई यांनी मोबाईल नंबर मागणीसाठी पत्रकार गेले असता चुकीचे गैरवर्तन केल्याबद्दल सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना तसेच मुख्यमंत्री कक्षाकडे व सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना निवेदन देण्यात आले. याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी तातडीने चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले. निवेदन देताना मेढा येथील प्रतिनिधी प्रमोद पंडित व शेखर जाधव उपस्थित होते. पत्रकार यांना मज्जाव केल्याबद्दल व मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी निश्चित कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले. याबद्दल फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र सातारा यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments