Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भुईंज पोलीसांची धडाकेबाज कामगिरी, दोनशे बकरी घेवून जाणारा ट्रक ताब्यात,३५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

 भुईंज पोलीसांची धडाकेबाज कामगिरी, दोनशे बकरी घेवून जाणारा ट्रक ताब्यात,३५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

------------------------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

सातारा जिल्हा प्रतिनिधी

किरण अडागळे 

------------------------------------------------------------

 पुणे बंगलोर महामार्गावर सातारा जिल्ह्यातील कवठे गावच्या हद्दीत सुमारे दोनशे बकरी घेवून निघालेल्या एका गुजराती ट्रक वर भुईंज पोलिसांनी धडाकेबाज अशी पहिलीच कारवाई केली व सुमारे ३५लाखाचा मुद्देमाल व दोन जण ट्रक सह ताब्यात घेतले. शुक्रवारी दिनांक चार ऑगस्ट रोजी सदर घटना घडली. जुनेज इब्राहिम भाई घेता व सरफराज युसुफभाई तीतोईया , दोघे राहणार गुजरात अशी अटक केलेल्याची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, चार ऑगस्ट रोजी विनापरवाना अवैधरित्या ट्रक मधून वाहतूक करुन परराज्यात घेऊन जात असल्याची माहिती भुईंज पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच भुईंज पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे, पोलिस हवालदार नितीन जाधव व पोलिस हवालदार दगडे यांनी कवठे गावच्या हद्दीत एका हाॅटेल वर उभा असलेल्या ट्रक क्रमांक. Gj-31T5913 यामध्ये २०० बकरी कोणतीही काळजी न घेता तसेच प्रशासनाची परवानगी न घेता अवैधरित्या केरळ राज्यात घेऊन निघाले होते. त्यावेळी सापळा रचून ट्रक पकडला . जनावरांचे हाल केल्याप्रकरणी ट्रक चालक जुनेज इब्राहिम भाई गेता व क्लिनर सरफराज युसुफभाई तीतोईया दोघे राहणार गुजरात यांना ताब्यात घेतले.व प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला अशी कारवाई करण्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. याबद्दल पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, वाईचे पोलिस उपविभागीय अधिकारी बाळासाहेब भालचिम, यांनी भुईंज पोलिस स्टेशनचे सपोनि रमेश गर्जे व सहकारी यांचे अभिनंदन केले

Post a Comment

0 Comments