Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

उत्कृष्ट पत्रकार विजय बकरे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल राजाराम कारखान्याचे माजी संचालक सुधाकर साळुंखे यांच्या हस्ते सत्कार.

 उत्कृष्ट पत्रकार विजय बकरे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल राजाराम कारखान्याचे माजी संचालक सुधाकर साळुंखे यांच्या हस्ते सत्कार.

राधानगरी येथील जय भवानी दूध संस्था यांच्या वतीने राधानगरी येथील ज्येष्ठ पत्रकार विजय बकरे यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व राजाराम कारखान्याचे माजी संचालक सुधाकर साळुंखे यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी संस्थेच्या कार्यालयामध्ये सह पत्नी चा , सत्कार करण्यात आला.

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 15 ऑगस्ट या रोजी राधानगरी येथील जय भवानी दूध संस्थे चा ध्वजारोहण राधानगरी ग्रामीण रुग्णालयाचे मेडिकल ऑफिसर गणपतराव गवळी यांच्या हस्ते करण्यात आला .

राधानगरी ग्रामीण रुग्णालयाचे मेडिकल ऑफिसर गणपतराव गवळी यांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये चांगल्या पद्धतीने काम केल्याबद्दल त्यांना नुकताच पुरस्कार जाहीर केला आहे त्यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, व माजी राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर साळुंखे यांच्या हस्ते शाल व श्री फळ देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच राधानगरी येथील ज्येष्ठ पत्रकार विजय बकरे उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल व डॉक्टर अमित काळे बेरे डॉक्टर डोंगळे तसेच अन्य पत्रकार यांचाही सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमास कोल्हापूर जिल्हा महिला काँग्रेसचे अध्यक्ष सौ सुप्रियाजी साळुंखे चेअरमन तानाजी पाटील सौरव साळुंखे सेक्रेटरी विघ्नेश नाईक संचालक संदीप दांडेकर कुंडलिक टिपू गडे सुनील चौगुले दिलशाद मुजावर मंगेश ढेरे कोंडीबा टिपुगडे दशरथ टिपुगडे आनंदा ढेरे आनंदा वाडकर ग्रामपंचायत सदस्य प्रकाश बालनकर इंद्रजी ढेरे ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

Post a Comment

0 Comments