Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शिरोली ग्रामपंचायतीसमोर कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न.

 शिरोली ग्रामपंचायतीसमोर कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न.


---------------------------------------------------------------------------------

---------------------------------------------------------------------------------

शिरोली ग्रामपंचायतीमधील पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी गोरखनाथ रामदास यादव यांनी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामपंचायतीसमोर अंगावर राॅकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने त्यातच गोरख च्या आईने हंबरडा  निर्माण  फोडल्याने काही काळ गोधळाची परिस्तिथी निर्माण झाली , यावेळी पोलिसांनी गोरख यांना  वेळीच ताब्यात घेतल्याने पुढचा अनर्थ टळला.  शिरोली ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी गोरनाथ यादव यांना गेल्या तीन महिन्यांपासून ग्रामपंचायतीने कोणतेही कारण न देता कामावरून काढून टाकले आहे. तसेच त्यांना झाडून काढणे,  गोरखनाथ यादव यांची नेमणूक ही पाणी पुरवठा सुपरवायझर म्हणून असून ते कायमस्वरुपी कामगार आहे असे असताना ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि कारभारी यांनी त्यांच्या मागे तगादा लावून त्यांना कामावर घ्यायचे नाही असे ठरवून गेल्या मे महिन्यापासून त्यांना कामावरुन काढून टाकले आहे. गोरखनाथ हे प्रामाणिकपणे काम करत असतानाही त्यांची बदली आरोग्य विभागात केलीय. तसेच गोरख यांना  कामावर न घेतल्याने त्यांचा पगार दिला नाही. त्यामुळे मला कामावर घ्या, अन्यथा १५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनादिवशी ग्रामपंचायतीसमोर आत्मदहन करू असा इशारा दिला होता. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, शिरोली पोलीस ठाणे, हातकणंगले तहसीलदार यांना निवेदन दिले होते. तसेच १४ ऑगस्ट रोजी शिरोली ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या मासिक बैठकीत गोरखनाथ यादव यांच्या विषयावर चर्चा झाली होती. यावेळी ग्रामपंचायतीने काही झाले तरी, त्यांना कामावर घ्यायचे नाही, असा निर्णय घेतला होता.त्यामुळे गोरखनाथ यादव यांनी संतापाच्या भरात असे पाऊल उचल्याची माहिती येत आहे.

Post a Comment

0 Comments