Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

स्व. माणिक पोदार लर्न स्कूल, वाढोणा येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा.

 स्व. माणिक पोदार लर्न स्कूल, वाढोणा येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा.

------------------------------
रिसोड प्रतिनिधी 
रणजित ठाकूर
------------------------------

ब्रिटिश राजवटीमधून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत स्वतंत्र झाला पण देशाची फाळणी देखील झाली. 14 ऑगस्ट दिवशी पाकिस्तान आणि 15 ऑगस्ट दिवशी भारत हा नवा देश अस्तित्त्वामध्ये आला.भारताचा 77 वा स्वातंत्र्यदिन यंदा साजरा केला गेला.ब्रिटिश राजवटी विरूद्ध आवाज उठवत भारताने स्वातंत्र्य मिळवले. 15 ऑगस्ट 1947 च्या रात्री भारत देश स्वतंत्र झाला. या दिवसाचं औचित्य साधत दरवर्षी 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासोबत देशासाठी झटलेल्या स्वातंत्र्यसेनानींना आदरांजली अर्पण केली जाते. यानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झेंडावंदन करून पंतप्रधान देशाला संबोधित करतात. या वर्षी या सोहळ्याला 76 वर्ष पूर्ण होत आपण 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. मग भारतमातेला नमन करत भारताच्या 77व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देण्यासाठीयंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हर घर तिरंगा' चं आवाहन केले होते.त्यामुळे भारताचा ध्वज केवळ महत्त्वाच्या ठिकाणी फडकणार नाही तर घराघरात फडकणार आहे. भारताचा स्वातंत्र्यदिन गल्लीपासून दिल्लीपर्यंत साजरा केला जातो. त्यामुळे या दिवसानिमित्ताने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याच दिनाचे औचित्य साधून स्व. माणिक पोदार लर्न स्कूल वाढोणा येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील परिसरामध्ये देशभक्तीमय वातावरण दिसून आले. यामध्ये सर्वप्रथम भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व मान्यवरांनी ध्वजारोहण केले. शाळेतील उपस्थित विद्यार्थी व सर्व कर्मचाऱ्यांनी, पालकांनी ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत गायन केले. या दिनाचे औचित्य साधून शाळेमध्ये विविध सांस्कृतिक देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या थोर महामानवांच्या वेशभूषा सादरीकरण करून उपस्थित आमची मने जिंकली. व आपल्या व्यक्तिरेखेनुसार सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून कार्यक्रमांमध्ये उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. देशभक्तीपर गीताच्या व नृत्याच्या सादरीकरण यांच्या माध्यमातून आपल्या अंगी असलेले देश भावना जागृत करण्याचे काम विद्यार्थ्यांनी केले. तसेच आपल्या नृत्यांमधून सामाजिक संदेश सुद्धा पोहोचविला. आपल्या अंगी देशाभिमान असणे आवश्यक आहे.हा सुद्धा संदेश त्यांनी आपल्या नृत्यांमधून दिला. यासोबतच विद्यार्थ्यांची व शाळेतील प्राचार्य यांची समायोचित भाषणे संपन्न झाली. भाषणामधून सर्वांनी देशभक्तीपर माहिती देऊन सर्वांना स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या. यानंतर कार्यक्रमाच्या समारोपामध्ये विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थी प्राजक्ता गोरे, नीरज लोंढे प्रस्तावना आरुषी देशमुख व आभार स्नेहा जमदाडे हिने मानले. यावेळी शाळेतील मान्यवर,कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.शाळेचे अध्यक्ष विनायकराव जाधव यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.

Post a Comment

0 Comments