Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बोरगाव पोलिसांची कामगिरी मोटार सायकल चोरटा बारा तासात गजा आड.

 बोरगाव पोलिसांची कामगिरी मोटार सायकल चोरटा बारा तासात गजा आड.

सातारा:- बोरगाव पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार हे बोरगाव पोलीस ठाणे गुरनं-384/2023 भा.द. वि. सं. क्र -379 मधील गुन्ह्यात चोरी गेली मोटारसायकल व अज्ञात चोरट्याचा शोध घेणेकामी पेट्रोलिंग करत असताना, नागठाणे ते सासपाडे रोडला गणेशवाडी गावाच्या हद्दीत एक संशयित इसम हा मोटार सायकल वरून फिरत असताना दिसला त्याला गुन्हेप्रकटीकरणाचे  पोलीस अंमलदार यांनी थांबविण्याचा तो इसम नथांबता पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्याला गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी  पाठलाग करून पकडले. त्याच्याकडे विचारपूस केली असता तो उडवा-उडवीची  उत्तरे देऊ लागला म्हणून त्याला विश्वासात घेऊन त्याचे नाव-गाव विचारले असता  त्याने त्याचे नाव राहुल उर्फ गोप्या मास्तर पवार वय 19 वर्षे रा- नागठाणे ता. जि. सातारा. असे सांगितले. त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने ताब्यातील होंडा कंपनीची एस एस मोसा क्रमांक MH11- Q- 3919 ही दिनांक 16/08/2023  रोजी नागठाणे गावामधून आणखी एक बजाज कंपनीची डिस्कवर मोसा क्रमांक MH11-BW- 0402 ही चोरली असल्याचे देखील सांगितले त्या प्रमाणे सदरची मोटार सायकल जप्त करण्यात आलेली आहे. सदर ची कारवाई मा. श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा. मा.श्री बापू बांगर अप्पर पोलीस अधीक्षक सो सातारा.मा. किरण कुमार सूर्यवंशी सो उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा शहर विभाग सातारा. यांचे मार्गदर्शनाखाली मा. रवींद्र तेलतुंबडे सहा. पोलीस निरीक्षक. मपोउपनिरीक्षक डाळिंबकर मॅडम, पोलीस नाईक दादा स्वामी, पोलीस नाईक प्रशांत चव्हाण पो कॉ केतन जाधव, पो कॉ प्रकाश वाघ यांनी कामगिरी बजावली असून पुढील अधिक तपास पो हवा सावंत व पोलीस नाईक आंब्राळे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments