Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

गांधीनगर मधील वाढत्या चोऱ्या रोखा व वाहतुकीच्या कोंडीवर उपाययोजना करा - करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.

 गांधीनगर मधील वाढत्या चोऱ्या रोखा व वाहतुकीच्या कोंडीवर उपाययोजना करा - करवीर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.

गांधीनगर पोलीस ठाणे अंतर्गत चोऱ्या वाढल्या आहेत. गेल्या दीड ते दोन वर्षा पासून आज अखेर सुमारे १४० वर चोऱ्या करून चोरट्यांनी पोलीसांना आव्हाहन दिले आहे. चोरट्यांनी या भागात ठाण मांडले आहे सामान्य जनता भयभीत झाली आहे. या १४० वर चोऱ्या झाल्या त्यातील काही ठिकाणचे सी.सी.टी.व्ही. चे फुटेज मिळुन ही तपास झाला नाही. उचगांव पैकी मणेरमळा येथील मंदिरातील चोरीचे फुटेज मिळुन ही चोर सापडले नाही अथवा त्याचा तपास झाला नाही चोरीचे वाढते प्रकार पाहता या विषयाकडे गांर्भियाने पाहिले पाहिजे होते पण गांधीनगर पोलीस ठाण्याकडून तसे झालेले दिसत नाही. ही बाब तमाम जनतेच्या दृष्टीने गंभीर आहे या चोरांचा तपास होणे जरूरीचे होते. तपास न झाल्याने चोरट्यांनी पुन्हा पुन्हा आव्हाहन दिले आहे. घरालाकुलुप लावून काबाड कष्टासाठी घरा बाहेर पडणे कठीण झाले आहे. गांधीनगर पोलीस ठाणे अंतर्गत परिसर असुरक्षीत झाला आहे. याबाबत गांर्भीयाने उपाययोजना व्हावी. तसेच तावडे हॉटेल ते चिंचवाड रेल्वे फाटकापर्यंतच्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी नेहमीच होत असेत उचगांव उड्डाण पुलाखाली वाहतुकीच्या कोंडीने परिसरातील नागरीक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर पोलीस हि दिसून येतात पण वाहतुकीच्या कोंडीवर उपाययोजना करण्यावर त्यांचे कायमचे दुर्लक्ष झाले आहे. गांधीनगर प्रसिध्द बाजारपेठ असून ग्राहक येथे खरेदीसाठी येत असतात वाहतुकीच्या कोंडी एवजी ग्राहकांच्या वाहनांकडे पोलीसांचे अधिक लक्ष असते. वाहतुकीला शिस्त लावणे बाजुला राहते व केवळ दंडात्मक कारवाई पोलीसांकडून केली जाते. ट्रान्सपोर्ट परिसरात तर वाहन तळ झाल्याचे दिसून येते. पोलीसांनी ठिकाणे निश्चित करून वाहतुकीला शिस्त लावली पाहिजे खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना त्रास होता कामानये काही ठिकाणी पट्टे न मारल्याने व मारलेले पट्टे अल्पावधीतच पुसुन गेल्याने परगावाहून येणारे ग्राहक त्यांचे वाहन टार्गेट होत आहे. ग्राहकांच्यावर हि बाजारपेठ चालते ग्राहक दंडात्मक कारवाईमुळे त्रस्त झाले आहे याबाबत व्यापारी वर्ग वाहतुक व्यवसायीक व संबंधीत घटकांची संयुक्त बैठक बोलवावी व त्यातुन याबाबत मार्ग काढावा. वाहतुकीला वेळीच शिस्त न लावल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करावे लागेल. असा इशारा देण्यात आला.

या मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी, करवीर यांच्या नावे देण्यात आले. मा. महादेव बुगडे, सहाय्यक फौजदार,करवीर यांनी हे निवेदन स्वीकारले.

    यावेळी मा.बुगडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तुमच्या मागण्यांबाबत कळवू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

यावेळी करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, उंचगाव प्रमुख दिपक रेडेकर, विभागप्रमुख दिपक पोपटाणी, युवासेना तालुकाप्रमुख योगेश लोहार, ग्राहकसेना तालुकाप्रमुख जितू कुबडे, शाखाप्रमुख दिपक अंकल, उपशाखाप्रमुख सुनील पारपाणी, अजित चव्हाण, बाबुराब पाटील, जितू चावला आदी उपस्थित होते.



Rs999/- च्या 2 जीन्स 1399/-

 (600/- रुपयांची बचत)

Rs999/- च्या 3 जीन्स 1999/-

 (1000/-रुपयांची बचत)

Rs799/- चे     3 शर्ट.    1299/-

  (1100/- रुपयांची बचत)

Rs799/- च्या 2 पॉपकॉन/पीनट/ट्वील     अरमानी.(हेवी क्वालिटी)                899/- (700/-रुपयांची बचत)

Rs 450/- चे दोन स्वीट टी-शर्ट 499/-

 (400/- रुपयांची बचत)

Rs450/- च्या दोन ट्रॅक्ट पॅन्ट 599/-

(300/- रुपयांची बचत)

Rs699/-चे दोन स्वेट जॅकेट 999/-

   (400/-रुपयांची बचत)

Rs699/- TPU JACKET 2 फक्त              

899/-.   (500/-रुपयांची बचत)

ब्रँडेड टी-शर्ट /जॅकेट्स वरती 25% सूट...

Zeel renkot  20% सूट...

लेडीज अँड किड्स वेअर -25% सूट..

अशा असंख्य ऑफर घेऊन येत आहे. 

अमर कलेक्शन पाचवड तालुका वाई जिल्हा सातारा  

ऑफर मर्यादित दिवसापूतीं राहील..


Post a Comment

0 Comments